अनारसे रेसिपी : Anarsa Recipe In Marathi

जाळीदार अनारसे बनवायचे असतील आणि तुमच्या कडे रेसिपी नसेल तर काळजी करू नका, आम्ही देतोय तुम्हाला जाळीदार अनारसे रेसिपी (Anarsa Recipe in Marathi). खुसखुशीत अनारसे घरच्या घरी बनवायला शिका.

Aanarse Recipe

जाळीदार अनारसे रेसिपी : Anarsa Recipe

महाराष्ट्रात, अधिकमासात जावयाला अनारसे भेट दिले जातात. दिवाळीच्या दिवसातही अनारसे, कित्येक घरांमध्ये बनवले जातात. अनारसा बनवायला जरी थोडा कठीण असला, तरी कोणतीही उत्तम सुगरण गृहिणी हा पदार्थ बनवतेच आणि चवीला उत्तम असलेला हा पदार्थ सर्वाना आग्रहाने खाऊ घालते.

९० च्या दशकातला काळातील दिवाळीची मजा काही औरच होती… गणेशोत्सव संपला कि लगेच नवरात्र सुरु होते आणि नवरात्र संपत नाही तोच दसरा दिवाळीची तयारी सुरू व्हायची. सर्वत्र फराळाच्या सामानाची आणि घरातील साफसफाई ची गडबड सुरु व्हायची असायची. दस-यानंतर घराघरांतून निरनिराळ्या फराळांचे सुगंध यायचे. चकली, करंजी, चिवडा, अनारसे, चंपाकळी, शंकरपाळी, चिरोटे आणि अजूनही कितीतरी फराळाचे पदार्थ. या सर्वात अनारसे बाजी मारून जायचा, कारण खूप कमी ठिकाणी अनारसे बनवले जात असतं. खसखशीवर फुलवलेल्या आणि मग तुपात सोडलेल्या अनारस्याचा सौम्य गोडसर वास घरभर दरवळत असायचा. चला तर खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे हे पाहूया

Aanarsa Recipe in marathi

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ१ तास
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण

साहित्य: Ingredients

 • १ किलो जाडसर चिकटा तांदूळ जून तांदूळ
 • एक किलो किसलेला गुळ किंवा एक किलो साखर
 • खसखस
 • तळण्यासाठी तूप

कृती: Cooking Instructions

अनारस्याचे पीठ कसे बनवायचे

 • १ किलो जाडसर चिकटा पकडून ठेवतील असे जून तांदूळ घ्या.
 • हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि मग परत पाणी भरून रात्रभर भिजवायचे.
 • सकाळी पाणी ओतून टाकायचे आणी पुन्हा पाणी भरून ठेवायचे. असे पाच दिवस करायचे.
 • पाचव्या दिवशी धुवून पाणी काढून टाकयचे. चटई अंथरून त्यावर स्वच्छ धुऊन सुकवलेल्या पांढ-या शुभ्र सुती कापड अंथरावे आणि धुतलेले तांदूळ सावलीमधे एक दिवसासाठी सुकवायला पसरवून ठेवायचे.
 • तसेच मिक्सरला अर्थातच पाणी न घालता बारीक पीठ करून बारीक चाळणीने‌ पीठ चाळून घ्यायचे.
 • ह्या पीठामधे एक किलो किसलेला गुळ किंवा एक किलो साखर घालायची, दोन चमचे साजूक तुप टाकायचे आणि अगदी व्यवस्थित एकजीव मळून घ्यायचे.
 • एका मोठ्या हे पीठ एका भांड्यात/डब्यात भरावे आणि त्यावर व्यवस्थित झाकण लावून हे भांडे चार दिवस झाकून ठेवायचे.
 • हे पीठ अनेक महिने तुम्ही वापरू शकता.
Rice Flour

People Also Read : काला जामून रेसिपी

अनारसे बनवण्याची कृती

 • अनारसे बनवण्यासाठी हवे तेवढे पीठ डब्यातून काढून घ्यावे
 • त्यावर दुधाचा हलका हात लावून ते पीठ चांगले मळून घ्यावे
 • मळलेल्या पिठाचे लहान गोळे करून घ्यावे .
 • कढईत तूप टाकून मंद आचेवर तूप गरम करून घ्यावे.
 • एका सपाट ताटामधे खसखस पसरून ठेवावी.
 • त्यावर पिठाचा लहान गोळा घेऊन हलक्या हाताने गोलाकार थापून घ्यावा.
 • आता कढईतील गरम तुपामध्ये, खसखस लावलेली बाजू वर राहील अश्या रीतीने अनारसे टाळण्यासाठी सोडावे.
 • मंद आचेवर अनारसे गोल्डन ब्राउन होई पर्यंत टाळून घ्यावे.
Aanarse Recipe

सोनेरी रंगाचा, ब्राऊनिश जाळीदार अनारसा हा दिसायला फार सुरेख दिसतो आणि चवीलाही अव्वल लागतो. तर तुम्हीही वर दिलेली अनारसे रेसिपी (Anarasa Recipe) वापरून, सुरेख दिसणारे आणि चवीला उत्तम असणारे अनारसे घरच्या घरी बनवून पहा आणि कसे झालेत हे आम्हाला ही कमेंट करून कळवा.

2 thoughts on “अनारसे रेसिपी : Anarsa Recipe In Marathi”

Leave a comment