चला मालदीवला, फक्त ५० हजार रुपयात ...

Pic Credit: Social Media

हॉलिवूड पासून बॉलीवूड पर्यंत सर्वांच्या आवडीचे ठिकाण म्हणजेच.... मालदीव 

Pic Credit: Social Media

तुम्हीही कमीत कमी बजेट मध्ये मालदीव चा प्लॅन करू शकता. तेथील अविस्मरणीय निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.

Pic Credit: Social Media

मालदीव ला राहण्यासाठी लक्झरी हॉटेल्स पासून होमस्टे  उपलब्ध आहेत. तुम्ही तेथील स्थानिक बेटावर राहू शकता.. तेही खूप कमी खर्चात... 

Pic Credit: Social Media

Pic Credit: Social Media

मालदीव ला जाण्यासाठी भारतातून १५-२० हजार रुपयांमध्ये रिटर्न तिकीट मिळेल . भारतीयांसाठी व्हिसा साठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. मालदीव ला पोचल्यावर तेथील बेटांवर जाण्यासाठी लोकल फेरी घ्यावी, म्हणजे तुमचा खर्च खूप कमी होईल.

शक्यतो मालदीव मध्ये राहण्यासाठी, स्थानिक लोकांच्या घरी किंवा बजेट हॉटेल्स मध्ये राहावे. लोकल साइटसीईंग ही तेथूनच बुक करावी.

Pic Credit: Social Media

Pic Credit: Social Media

तेथील स्थानिकांकडूनच  वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चे बुकिंग करावे. म्हणजे तुम्हाला कमी खर्चात अविस्मरणीय आनंद घेता येईल... मालदीव हा बेटांचा देश असल्याने, तेथे जेवणाचा खर्च थोडाफार जास्त होऊ शकतो...

Pic Credit: Social Media

मालदीव मध्ये असणारी लक्झरी हॉटेल्स पाहण्यासाठी तुम्ही त्या रिसॉर्टची डे टूर करू शकता. आणि रिसॉर्ट मधले लक्झरियस गोष्टींचा अनुभव घेऊ शकता.. या डे टूर मध्ये जाण्यायेण्याचा खर्च, जेवणाचा खर्च समाविष्ट असतो.

Pic Credit: Social Media

मालदीव ट्रिप साठी एकूण खर्च फ्लाईट तिकिट्स : १५-२० हजार व्हिसा फी :- ० लोकल बोट फेरी : २००-५०० रु हॉटेल्स/होमी स्टे: ३०००-५०००/ दिवस एक दिवस रिसॉर्ट टूर : ८०००-१०००० रुपये इतर खर्च : जेवण, वॉटर स्पोर्ट्स, खरेदी इत्यादी एकूण खर्च : ४०-५० हजार प्रत्येकी 

Pic Credit: Social Media

मालदीव मध्ये स्वस्तात राहण्यासाठी बेटे १. माफुशी बेट (Mafushi island) २. फुलीधु बेट (Fulidhoo Island) ३. धीफुशी बेट (Dhiffushi island) ४. थुलसधु बेट (Thulusdhoo island) ५.  गुरडू बेट (Guraidhoo island)