पावसाळ्यातही गोवा खूप छान दिसतं. तुम्ही गोव्यातील ही १० ठिकाणे पावसाळ्यात पाहायलाच हवीत.
1. तांबडी सुर्ला मंदिरतांबडी सुर्ला मंदिर आणि थेथून जवळच असलेला धबधबा तुम्ही पावसाळ्यात पाहायलाच हवा. हिरवाईने वेढलेले मंदिर आणि धबधबा तुम्हाला नक्कीच ताजेतवाने करेल.
2. दुधसागर धबधबागोव्यातील दूधसागर धबधबा खूपच प्रसिद्ध आहे. कित्येक सिनेमा मध्ये ही तो दाखवला गेला आहे. येथे पोहचयनसाठी तुम्ही भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यातून जीप सफारी किंवा ट्रेक करू शकता.
3.भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यपावसाळ्यात तुम्हाला घनदाट जंगलातून फिरत वैविध्यपूर्ण वन्यजीव पहावयाचे असतील, तर भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी.
4.गोव्यातील चर्च पावसाळ्यात तुम्ही गोव्यातील चर्च पाहायलाच हवेत. कोसळणाऱ्या जलधारांनी या ठिकाणच्या चर्च चे रूप अजूनच खुलून दिसते.
5.बॅसिलिका ऑफ बॉम जिझस
युनेस्कोच्या या जागतिक वारसा स्थळाला अगदी पावसाळ्यात भेट द्यायलाच हवी. बॅसिलिकाच्या आतील बरोक वास्तुकला आणि सेंट फ्रान्सिस झेवियरचे नश्वर अवशेष हे एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे.
6.बटरफ्लाय बीच पावसाळ्यात बीचवरील हॉटेल्स जरी बंद असली, तरी काही बीच तुम्ही पाहायलाच हवेत. बटरफ्लाय बीच ला जाणारा ट्रेक करत,तुम्ही या बीच चे पावसाळ्यातील अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता.
7.spice ट्री प्लान्टटेशन पावसाळ्यात तुम्ही गोव्यातील मसाल्याच्या बागांना भेट देऊन एक वेगळाच अनुभव घेऊ शकता.
8.चापोरा किल्ला "दिल चाहता है" सिनेमात दाखवलेला गोव्यातील हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. येथून तुम्ही अथांग अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहत सूर्यास्ताचा अनुभव ही घेऊ शकता. मान्सूनचे ढग येथील लँडस्केपमध्ये अजूनच वेगळी मजा घेऊन येतात.
9.अगौडा किल्लापागोव्यात तसे अनेक किल्ले आहेत, पण १७व्या शतकातील अगौडा किल्ला हा तर पावसाळ्यात पाहायलाच हवा. येथील दीपगृहातून दिसणारे निसर्गाचे भव्य रूप नक्कीच पाहण्यासारखे आहे.पावसाळ्यात तुम्ही गोव्यातील मसाल्याच्या बागांना भेट देऊन एक वेगळाच अनुभव घेऊ शकता.
10.गलगीबाग बीच गोव्यातील गालगीबाग बीच हा मात्र वर्षातून कोणत्याही वेळी आणि कितीही वेळा तुम्ही पाहिलात तरी त्याचे सौंदर्य कमी होत नाही.