आंबा कोलंबी-आमखंडी (वाडवळी पद्धतीने) : Amba Kolambi -Aamkhandi Recipe in Marathi

आंबा कोळंबी – आमखंडी … नुसतं नाव जरी घेतले तरीही मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. तर आज आम्ही तुम्हाला देत आहोत आंबा कोळंबी – आमखंडी रेसिपी (वाडवळी पद्धत) (Amba Kolambi -Aamkhandi Recipe in Marathi). या रेसिपीला जास्त वेळ हि लागत नाही आणि साहित्य हि जास्त लागत नाही…

Amba Kolambi - Aamkhandi Recipe in Marathi

आंबा कोलंबी-आमखंडी : Amba Kolambi -Aamkhandi Recipe

मांसाहारी लोकांना नेहमीच नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला आवडतात. कित्येक वेळेस घरातील गृहिणीला हि लवकर जेवण बनवायचे असते. अशावेळेस भाताबरोबर जर कोलंबीचं कालवण मिळाले, तर मांसाहारी खवय्या नक्कीच खुश होतो. तर आज आपण पाहणार आहोत आंबा कोळंबी रेसिपी (Amba Kolambi -Aamkhandi Recipe). काहीजण याला आमखंडी असेही म्हणतात. वाडवळी पद्धतीने आंबा कोळंबी कशी करावी याची रेसिपी आज देत आहे. तुम्ही अगदी सहजतेने हि रेसिपी घरी बनवू शकता.

Amba Kolambi-Aamkhandi Recipe

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ३० मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण
Amba Kolambi - Aamkhandi Recipe in Marathi

कोलंबी-आंबा किंवा आमखंडी करण्यासाठी लागणारे साहित्य: Ingredients for Amba Kolambi -Aamkhandi Recipe

कोलंबी-आंबा किंवा आमखंडी साठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे;

  • २०-२५ कोळंबी
  • १ मोठी कैरी
  • २ कांदे
  • १ बटाटा (हवा असल्यास)
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • आले लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • वाडवळी मसाला
  • हळद पावडर
  • चवीपुरते मीठ
  • चिमूटभर साखर

People Also Read : कुरकुरीत बोंबील फ्राय रेसिपी 
Raw Mango

Ginger Garilic Paste

Prawns

कृती: Cooking Instructions

  • बाजारातून लहान किंवा मध्यम आकाराची कोळंबी घेऊन यावी.
  • घरी आणल्यावर कोळंबी चांगली साफ करून घ्यावी, पण कोलंबीची साले काढू नये.
  • एक मोठी कैरी घेऊन तिचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
  • २ मोठे कांदे उभे चिरून घ्यावेत.
  • एका जाड बुडाच्या कढईत तेल गरम करावे.
  • आता त्यात कापलेला कांदा चांगला परतून लालसर रंगावर शिजवून घ्यावा.
  • कांदा शिजल्यावर, त्यात मिरची, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, वाडवळी मसाला, सेलम हळद, हवे असल्यास बटाट्याचे काप आणि चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे.
  • मिश्रण चांगले एकजीव केल्यावर, त्यात कैरीचे तुकडे आणि साफ केलेली कोळंबी टाकून पुन्हा व्यवस्थित ढवळावे.
  • आता थोडे पाणी टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
  • कढई वर झाकण ठेवून त्यावर थोडे पाणी घालून भाजी वाफेवर चांगली शिजवावी.
  • भाजी चांगली शिजली कि त्यावर कोथिंबीर घालून पुन्हा एकदा भाजी ढवळून घ्यावी.
  • नावाप्रमाणे आंबा कोळंबी – आमखंडी या भाजीत आंबा आणि वाडवळी मसाला असल्याने चवीला भाजी आंबट-गोड लागते.
  • गरमागरम भाताबरोबर हि भाजी सर्व्ह करावी.

People Also Read : सुरण-बटाटा कटलेट रेसिपी

Amba Kolabi Recipe

काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips

  • कोळंबी शक्यतो लहान किंवा मध्यम आकाराच्या घ्यावी.
  • कोळंबीची साले काढू नये, फक्त पाय, शेपटी आणि मधला काळा धागा काढावा.
  • कोळंबी ऐवजी करंदी वापरूनही तुम्ही ही भाजी करू शकता.
  • आवडत असल्यास आलेलसूण, कोथिंबीर, मिरची आणि एखादा टाॅमेटो असे मिक्सरमधून जाडसर वाटावे. हे वाटण वापरून तुम्ही जाडसर रस्सा बनवू शकता.
  • नवीन काही ट्राय करायचे असेल तर थोडेसे नारळाचे दुध या भाजी मध्ये घालावे , छान चव येते.

Karandi

Amba Kolabi Recipe

वर दिलेली आंबा कोलंबी- आमखंडी रेसिपी (Amba Kolambi -Aamkhandi Recipe) वापरून, तुम्ही ही घरच्या घरी ही आंबा कोलंबी- आमखंडी बनवा आणि भाजी कशी झाली ते आम्हालाही कमेंट करून कळवा.


1 thought on “आंबा कोलंबी-आमखंडी (वाडवळी पद्धतीने) : Amba Kolambi -Aamkhandi Recipe in Marathi”

  1. छान माहिती दिली श्रावण संपल्यावर करुन सांगतो

    Reply

Leave a comment