ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या सापळ्यापासून सावधान : Beware from Online Task Fraud

ऑनलाइन टास्क फ्रॉड (Online Task Fraud) म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या, नाहीतर तुम्ही ही सायबर चोरांच्या अमिषाला बळी पडून आपली सर्व कमाई गमावून बसाल. तुम्हाला ‘ऑनलाइन टास्क’द्वारे पैसे कमवा, अशा आशयाचा संदेश किंवा कॉल येत असतील तर लगेच सावधान व्हा .. ऑनलाइन टास्क फ्रॉड (Online Task Fraud) ही सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी लढवलेली अनोखी शक्कल आहे. तुम्हाला या फ्रॉड पासून वाचायचे असेल तर हा लेख नक्की वाचा .

Online Task Fraud

ऑनलाइन टास्क फ्रॉड : What is Online Task Fraud

ऑनलाइन टास्क फ्रॉड (Online Task Fraud) मध्ये, सायबर गुन्हेगार तुम्हाला व्हाट्सअप, टेलिग्राम किंवा अन्य समाजमाध्यमाद्वारे संदेश पाठवून आर्थिक लाभाचे आमीष दाखवतात. त्यांची मोडस ऑपरेंडी सेम असते, सर्वप्रथम तुम्हाला जाहिरात किंवा चित्रफितीला लाइक किंवा क्लिक करण्याचे काम देण्यात येते. त्यासाठी काही वेळेस, त्यांच्या साईट वर रेजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जाते. एकदा तुम्ही रेजिस्ट्रेशन केले कि तुमच्या अकाउंट वर थोडीफार रक्कम जमा केली जाते आणि नंतर काही टास्क पूर्ण करण्यास सांगितले जातात. तुम्ही हे टास्क पूर्ण केले, कि लगेच तुमच्या अकॉउंट मध्ये त्याचा मोबदला म्हणून काही रक्कम जमा केली जाते. हा सिम्पल टास्क पूर्ण केल्यावर, तुम्हाला काही व्हिडिओज लाइक करायला लावतात किंवा एखाद्या कंपनीसाठी रिव्ह्यू लिहिण्यास सांगितले जाते किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर एखाद्या व्यक्तीला फॉलो करायचे असते.

Online Task Fraud

मोडस ऑपरेंडी : Modus Operandi

साधारणतः कुणी ही अगदी विनासायास टास्क पूर्ण करेल, असेच टास्क सुरवातीला दिले जातात आणि त्याचा मोबदला हि दिला जातो. विशेष म्हणजे प्रत्येक टास्क पूर्ण केल्या नंतर मिळणारी रक्कम वेगवेगळी असू शकते, जेणेकरून तुम्ही त्यांच्या सापळ्यात अलगद अडकले जाल. काहीच दिवसात तुम्हाला भरपूर मोबदला मिळणारे टास्क चे आमिष दाखवले जाते, पण हे टास्क पूर्वी प्रमाणे फ्री नसून पेड असतात. तुमची तयारी असेल आणि तुम्ही पैसे भरले, कि तुम्हाला एका विशिष्ट टेलिग्राम ग्रुप यामध्ये ऍड केले जाते. जेथे तुमच्या सारखे अनेक जण असतात आणि त्यातच सायबर चोरही सामील असतात.

आता सायबर चोरांचा किंवा गुन्हेगारांचा खरा खेळ सुरु होतो आणि या टास्क फ्रॉड (Online Task Fraud) मध्ये तुम्ही पूर्ण अडकले जाता. त्या ग्रुप मध्ये, विविध टास्क करण्यासाठी मिळणारी रक्कम आणि त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक यांची माहिती दिली जाते. लवकरात लवकर तुम्ही पैसे भरावेत यासाठी प्रयत्न केले जातात. या ग्रुप मध्ये सायबर गुन्हेगार स्वतः असल्याने, ते पैसे भरल्याचे सांगून त्याचे स्क्रीन शॉट टाकतात. त्यांच्या या कृती मुळे इतर मेंबर्स ही पैसे भरतात. काहीजण मोठ्या अमिषापोटी १-२ लाख भरून सुरवात करतात.

People Also Read : जिओबुक लॅपटॉप : JioBook Launched in Just ₹16,499

एकदा तुम्ही हे पैसे गुंतवले की, मग तुम्हाला एका क्रिप्टो करन्सी, हॉटेल बुकिंग किंवा इतर ट्रेड करणार्‍या वेबसाइटवर नेले जाते.या साईट वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जाते आणि मग तुम्हाला एक इ-वॅलेट दिले जाते. तुम्ही टास्क पूर्ण केले कि या इ- वॅलेट मध्ये पैसे जमा होताना दिसतात. वॅलेट मध्ये रोजच्या रोज जमा होणारे पैसे पाहून तुम्ही अजून पैसे गुंतवता. काही जण आपल्या वॅलेट मधले जमा झालेले पैसे, आपल्या बँक खात्यात जमा करा म्हणून मागे लागतात. त्यांना ’अजून टास्क पूर्ण झाला नाहीये, कालावधीच्या आधी पैसे हवे असतील तर १-२ लाख रुपये भरा, ते नंतर परत मिळतील असे सायबर गुन्हेगारांकडून सांगितले जाते. काही वेळा तर सायबर गुन्हेगारांकडून धमकावले देखील जाते.

Online Task Fraud

ऑनलाइन टास्क फ्रॉड च्या तक्रारी : Online Task Fraud Complaints

ऑनलाइन टास्क फ्रॉड मध्ये बिझिनेसमॅन, गृहिणी, उच्चशिक्षित तरुण-तरुणींची फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांनी मोठी गुंतवणूक केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तोडला जातो आणि आपली फसवणूक झाले हे लक्षात येईपर्यंत, त्यांनी आपल्या कष्टाची कमाई सायबर चोरांच्या घशात घातली असते. नुकतेच गुजरात मधील जयेश वकील नावाच्या माणसाला २.५ कोटी रुपयांचा चुना लावला गेला. पुणे सारख्या शहरातील सायबर पोलिस ठाण्यात, मागील आठ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीच्या १११४ तक्रारी आल्या आहेत. यातील सर्वाधिक १८२ तक्रारी ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या आहेत.

Online Task Fraud
Online Task Fraud

ऑनलाइन फसवणुकीचे काही गुन्हे :

  • ७१ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांचा गंडा
  • संगणक अभियंत्याला ९.७५ लाख रुपयांचा गंडा
  • आयटी अभियंत्याला १७.४४ लाख रुपयांना गंडा
  • ५४ वर्षीय नागरिकाची ३.६८ लाख रुपयांची फसवणूक
  • नोकरीच्या आमिषाने आणि यूट्यूब सबस्क्राइब रिचार्ज टास्क देऊन, तरुणाची १२ लाख ६५ हजार ६८७ रुपयांची फसवणूक
  • चित्रफिती ‘लाइक’ करण्याच्या बहाण्याने हडपसर येथील तरुणाची १४ लाख ८७ हजार ७१९ रुपयांची फसवणूक
  • अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने चंदननगर भागातील दहा जणांची २५ लाख ६५ हजार २०४ रुपयांची फसवणूक
  • महिलेची १७ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक
  • कर्वेनगर भागातील एकाची सात लाख १४ हजार रुपयांची फसवणूक
  • नाशिकच्या (Nashik) एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला अशाच प्रकारे 5 लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना हॉटेल बुकिंगचा एक टास्क दिला गेला होता.

Online Task Fraud

देशभरात कित्येक जण या ऑनलाइन टास्क फ्रॉड ला बळी पडले असून, हा घोटाळा ५०० कोटी पेक्षा अधिक रकमेचा असू शकतो. तरी सर्वानी या गोष्टीची माहिती घेऊन, स्वतःला अशा मोहापासून लांब ठेवून आपली स्वकष्टाची कमाई वाचवावी.

2 thoughts on “ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या सापळ्यापासून सावधान : Beware from Online Task Fraud”

  1. Hi there, just became alert to your blog through Google, and found that it’s really informative.
    I am going to watch out for brussels. I will appreciate
    if you continue this in future. Numerous people will be benefited from your
    writing. Cheers! Escape room

    Reply

Leave a comment