आज आपण सुरण-बटाटा कटलेट रेसिपी (Suran Batata cutlet recipe in Marathi) वापरून रुचकर आणि स्वादिष्ट कटलेट कसे बनवायचे हे पाहूया. सुरण-बटाटा कटलेट रेसिपी (Yam-Potato cutlet Recipe) खुप सोपी असून तुम्ही अगदी सहजतेने हे कटलेट घरी बनवू शकता.
सुरण-बटाटा कटलेट रेसिपी : Suran Batata Cutlet recipe
सुरणाचे अनेक पदार्थ बनवता येतात, उदाहरणार्थ सुरणाची भाजी, सुरणाचे तळलेले काप. तर आज आपण सुरण आणि बटाटा वापरून करणार आहोत सुरण-बटाटा कटलेट (Suran Batata cutlet recipe). थोड्याश्या तेलावर शॅलो फ्राय केले तरीही खूप चविष्ट बनतात आणि सर्वजण अगदी आवडीने खातात.
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | १५-२० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
किती जणांना पुरेल | २-४ जण |
साहित्य: Ingredients
सुरण-बटाटा पॅटिस/ कटलेट साठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे ;
- २ वाटी सुरण
- २ वाटी बटाटा
- ४-५ सफेद किंवा ब्राऊन ब्रेड स्लाईस
- १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा,
- १/२ वाटी कोथिंबीर
- २ चमचा आले लसूण मिरची पेस्ट
- धणा पावडर
- जीरा पावडर
- चाट मसाला
- गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- हवे असल्यास चीझ
- तळण्यासाठी तेल
- लिंबाचा रस
- आवडत असल्यास मटार
कृती: Cooking Instructions
- सर्वप्रथम दोन वाटी सुरण सोलून साफ करून घ्यावे.
- दोन वाटी होईल इतका बटाटा सोलून घ्यावा..
- आता सुरण आणि बटाटा कुकरमध्ये टाकून, ३-४ शिट्ट्या घेऊन चांगला शिजवून घ्यावा.
- कुकरमधून सुरण आणि बटाटा काढून एका प्लेट मध्ये घ्यावा.
- आता त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आले लसणाची पेस्ट, धनापावडर, जिरा पावडर, चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि आवडत असल्यास चीज आणि मटार टाकावेत आणि मिश्रण चांगले घट्ट मळून घ्यावे.
- वरील मिश्रणात थोडीशी कोथिंबीर,लिंबाचा रस टाकावा आणि पुन्हा चांगले मळून घ्यावे.
- ४-५ ब्रेड चे स्लाइस थोड्याश्या पाण्यात भिजवून घ्यावेत. आणि तेही वरील मिश्रणात मळून चांगले एकजीव करावेत.
- आता या मिश्रणाचे पॅटिस/कटलेटच्या आकाराचे चपटे गोळे थापून घ्यावेत.
- पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यावर हे कटलेट शॅलो फ्राय करून घ्यावेत.
- चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम कटलेट सर्व्ह करावेत.
People Also Read : स्ट्रीट स्टाईल कच्छी दाबेली रेसिपी
काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips
- बाजारातून सुरण नीट बघून आणावा,सुरण खाजरा नसावा.
- मटारचे आख्खे दाणे टाकावेत.
- मिरची आणि गरम मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलावे.
People Also Read : स्वादिष्ट आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी
वर दिलेली सुरण-बटाटा कटलेट रेसिपी वापरून तुम्ही ही अगदी सहजतेने घरच्या घरी रुचकर आणि स्वादिष्ट कटलेट बनवून पहा आणि सुरण-बटाटा कटलेट कसे झाले ते आम्हालाही कमेंट करून कळवा.
Awsome article and right to the point. I am not sure if this is
really the best place to ask but do you guys have any thoughts on where
to hire some professional writers? Thanks 🙂 Najlepsze escape roomy
Rattling good information can be found on blog..
Very interesting information!Perfect just what I
was searching for! Travel guide