आता तुम्ही घरीच बनवा स्वादिष्ट कोकोनट कुकीज : Coconut Cookies Recipe in Marathi

लहान मुलांना कुकीज खायला खूप आवडतात. काही वेळेस मोठी माणसे पण कुकीजचा आस्वाद चहा बरोबर घेताना दिसतात. तर आज आपण घरीच बनवता येणारी कोकोनट कुकीज रेसिपी (Coconut Cookies Recipe in Marathi) पाहुया. ही रेसिपी वापरून तुम्ही आबालवृद्धांना आवडणारी नारळाची बिस्किटे म्हणजेच कोकोनट कुकीज, अगदी सहज आपल्या घरी बनवून सगळ्यांना खुश करू शकता.

Coconut Cookies

अगदी सहज बनवा कोकोनट कुकीज : Coconut Cookies Recipe in Marathi

कोकोनट कुकीज तुम्ही चहा बरोबर किंवा नुसतीही खाऊ शकता. आज आपण अंडे न वापरता या कोकोनट कुकीज कश्या बनवायच्या हे पाहुया. अंडे न वापरल्याने या कुकीज, शाकाहारी किंवा मांसाहारी कुणीही खाऊ शकतात. कोकोनट कुकीज करण्यासाठी तुमच्या कडे ओव्हन असणे गरजेचे आहे, म्हणजे तुमचे काम खूप सोपे होईल. चला तर कोकोनट कुकीज रेसिपी (Coconut Cookies Recipe in Marathi) वापरून चविष्ट आणि कुरकुरीत कोकोनट कुकीज बनवूया.

Coconut Cookies Recipe in Marathi

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ४० मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण

Coconut Cookies

कोकोनट कुकीज करण्यासाठी लागणारे साहित्य: Ingredients for Coconut Cookies Recipe

कोकोनट कुकीज करण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे;

  • २०० ग्राम मैदा
  • २०० ग्राम पिठी साखर
  • २०० ग्राम डालडा
  • १५० ग्राम डेसिकेटेड कोकोनट (desiccated coconut)
  • ५० ग्राम मिल्कपावडर
  • १/४ टीस्पून कोकोनट इसेन्स
  • १/४ टीस्पून बेकिंग पावडर

People Also Read : काकडीचे घारगे रेसिपी 

desiccated coconut

कृती: Cooking Instructions

  • एका परातीत डालडा/तूप टाकून तो हलका होई पर्यंत चांगला फेसून घ्यावा.
  • आता या डालडा/तूप मध्ये पिठीसाखर टाकावी.
  • तूप आणि पिठीसाखर यांचे मिश्रण चांगले एकजीव होईल असे मळून घ्यावे.
  • मैदा चाळून घ्यावा आणि तो वरील मिश्रणात टाकावा.
  • आता त्यात बेकिंग पावडर टाकावी.
  • १५० ग्राम डेसिकेटेड कोकोनट पावडर पैकी १०० ग्राम पावडर, वरील मिश्रणात टाकावी.
  • आता हे सर्व मिश्रण एकजीव करून नरम गोळा मळावा.
  • या नरम गोळ्याचे ३०-४० एकसारखे गोळे करून घ्यावेत.
  • प्रत्येक गोळ्याला पेढ्यासारखा आकार देऊन, उरलेल्या डेसिकेटेड कोकोनट पावडर मध्ये घोळवून घ्यावे.
  • बेकिंग ट्रे ला हलकेसे बटर किंवा तूप लावावे.
  • ट्रे मध्ये कोकोनट कुकीज ठेवून प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये १२० डिग्री तापमानाला २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे.
  • तुमची कोकोनट कुकीज खाण्यासाठी तयार आहेत.

desiccated coconut

Coconut Cookies

People Also Read : विदर्भ स्पेशल सांबार वडी-पुडाची वडी

काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips

  • डालडा वापरण्याअगोदर १ दिवस फ्रिज मध्ये ठेवावा.
  • प्री-हिट ओव्हन मध्ये १८० डिग्री तापमानात १५ मिनिटे ठेवून कुकीज बेक करू शकता.

Coconut Cookies

वर दिलेली कोकोनट कुकीजची रेसिपी (Coconut Cookies Recipe in Marathi) वापरून तुम्ही ही घरच्या घरी ही कोकोनट कुकीज बनवा आणि कशी झाली ते आम्हालाही कमेंट करून कळवा.

3 thoughts on “आता तुम्ही घरीच बनवा स्वादिष्ट कोकोनट कुकीज : Coconut Cookies Recipe in Marathi”

  1. Hi there, just became aware of your blog through
    Google, and found that it’s truly informative. I am going
    to watch out for brussels. I will be grateful if you continue
    this in future. A lot of people will be benefited from your writing.
    Cheers! Najlepsze escape roomy

    Reply

Leave a comment