कोलंबीची अळूवडी : Prawns Alu Wadi Recipe in Marathi

अळूवडी म्हटले कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. हीच अळूवडी जर कोळंबी वापरून बनवता आली तर ? चला तर आज आपण कोळंबी भरलेली स्वादिष्ट अळूवडी (Prawns Alu Wadi Recipe in Marathi) कशी बनवायची ते पाहूया.

Prawns Alu Wadi Recipe in Marathi

कोळंबी भरलेली स्वादिष्ट अळूवडी : Prawns Alu Wadi Recipe

श्रावण महिन्यात, महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अळूच्या वड्या बनवल्या जातात आणि सर्व जण आवडीने त्याचच आस्वाद हि घेतात. पारंपरिक अळूवडी खूपच स्वादिष्ट आणि रुचकर असते. लहान मुलांपासून मोठांपर्यंत सर्वजण पानात वाढून घेतात आणि आवडीने खातात. याच अळूवडी चे नवीन रूप आज आपण पाहणार आहोत, ते म्हणजे कोळंबी अळूवडी. कोलंबी भरलेली भन्नाट अळूवडी ची रेसिपी (Prawns Alu Wadi Recipe) आज तुम्हाला देणार आहोत . श्रावण महिना संपल्यावर, अळूवडी ची रेसिपी नक्की करून बघा आणि आणि घरातील सर्वाना खुश करा.

Aluwadi

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ३०-४५ मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण

कोलंबी अळूवडी करण्यासाठी लागणारे साहित्य: Ingredients for Prawns Aluwadi Recipe

कोलंबी अळूवडी साठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे;

साहित्य:

  • अळूची मोठी – मध्यम पाने
  • २०-२५ मध्यम आकाराच्या कोळंबी
  • दोन-तीन वाटी बेसन
  • पाऊण वाटी किसलेला गूळ
  • पाऊणवाटी चिंचेचा कोळ
  • दोन चमचे आले-लसूण- मिरची पेस्ट दोन चमचे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २-३ चमचे बेडगी मिरची पावडर
  • १-२ चमचा गोडा मसाला
  • अर्धा चमचा सेलम हळद पावडर
  • चवीपुरते मीठ
  • अर्धा चमचा साखर

Aluwadi Leaves

Prawns

People Also Read : आंबा कोळंबी – आमखंडी रेसिपी

कृती: Cooking Instructions

  • बाजारातून मध्यम आकाराच्या कोळंबी आणून नीट साफ करून घ्याव्यात.
  • कोळंबीला आले-लसूण-मिरची पेस्ट, हळद, मिरची पावडर व मीठ लावून अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यावे.
  • हवं असल्यास कोकम आगळ किंवा लिंबाचा रस सुद्धा लावून ठेवू शकता.
  • अळूची पाने नीट धुवून घ्यावीत.
  • अळूच्या पानाचे देठ काढून सपाट करून घ्यावे.
  • एका भांड्यात बेसन+ गरम मसाला+ मीठ+चिंचेचा कोळ+ तिखट मिरची पावडर+ आले-लसूण-मिरची पेस्ट+ हळद आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर असे सारे एकजीव होईपर्यंत मिक्स करा.
  • आता हे मिश्रण अळूच्या पानावर लावून घ्यावे.
  • त्यावर मॅरीनेट केलेल्या कोळंबीचे तुकडे अळूच्या पानावर पसरावावेत.
  • दुसरे पानही उलट्या बाजूने पण आधीच्या पानाच्या टोकाच्या विरूद्ध दिशेने अशाप्रकारे पानावर ठेऊन त्या पानालाही वडीचे मिश्रण आणि मॅरीनेट कोळंबीचे मिश्रण व्यवस्थित लावा.
  • अशा प्रकारे चार पाने लावून घ्यावीत आणि वडीचा लोण वळून घ्यावा.
  • उकड पात्राच्या तळाला तेलाचा हलकासा हात लावून घ्यावा.
  • आता हा रोल/लोण २० मिनिटे चांगला वाफवून घ्यावा.
  • रोल थोडा थंड झाला कि सुरीने बारीक वड्या कापून घ्याव्यात.
  • तव्यावर तेल टाकून, अळूवड्या मध्यम आचेवर चांगल्या तळून घ्याव्यात किंवा शॅलो फ्राय करून घ्याव्यात.
  • तुमची कोळंबी भरलेली अळूवडी खाण्यासाठी तयार आहे.

Marinated Prawns

Aluwadi roll

Prawns Aluwadi

People Also Read : ओल्या जवळ्याची खमंग भजी

काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips

  • कोळंबी शक्यतो लहान किंवा मध्यम आकाराच्या घ्यावी.
  • अळूची लहान-मोठी पाने घ्यावीत आणि त्याच्या मागच्या बाजूच्या शिरा व्यवस्थित काढून घ्या.
  • पानावरुन घरातील लाटणे फिरवावे म्हणजे अळूचे पान एकदम सपाट होते.
  • एका अळुवडीच्या लोड साठी ५-७ पानं लागतात.
  • कोळंबीच्या ऐवजी तुम्ही करंदी वापरूनही मांसाहारी अळूवडी बनवू शकता.