आपल्यापैकी बऱ्याच जणांना गोड खायला खूप आवडते, आणि अशा लोकांसाठी आम्ही देत आहोत बेळगावी कुंदा रेसिपी (Belgavi Kunda Recipe). बेळगावी कुंदा ही स्वीट डिश सर्वत्र खूप प्रसिद्ध आहे. घरच्या घरी ही डिश बनवता येते आणि सर्वजण आवडीने खातात.
बेळगावी कुंदा रेसिपी : Belgavi Kunda Recipe
बेळगावी कुंदा (Belgavi Kunda) या नावाची कथा तशी रोचक आहे. राजस्थान मधून आलेल्या जगन्नाथ पुरोहित याचे बेळगावात मिठाईचे दुकान होते. एकदा मिठाई करताना खवा थोडा अधिक भाजला गेला आणि त्यामुळे त्याचा रंगही बदलला. याच खव्याची त्याने मिठाई बनवली आणि त्याला कुंदा या मुलीचे नाव दिले.
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
किती जणांना पुरेल | २-४ जण |
People Also Read : काला जामून रेसिपी
साहित्य: Ingredients
- १/२ लिटर म्हशीचे दूध
- १ टीस्पून डिंक पावडर
- १ टीस्पून बारीक रवा
- १ टीस्पून दही
- १ टीस्पून साजूक तूप
- ५० ग्राम साखर
- बदामाचे तुकडे
- पिस्ताचे तुकडे
- १ टीस्पून वेलची पावडर
- चांदीचा वर्ख
People Also Read : अनारसे रेसिपी
कृती: Cooking Instructions
बेळगावी कुंदा बनवण्याची कृती
- एका कढईत तूप गरम करावे
- तूप गरम झाल्यावर त्यात डिंक पावडर टाका
- डिंक फुलून आल्यावर त्यात बारीक रवा टाका.
- आता हे सर्व मिश्रण ब्राऊन कलर येई पर्यंत भाजा.
- आता त्यावर म्हशीचे दूध टाका व दुधाला उकळी येईपर्यंत गरम करा.
- दुधाला उकळी आल्यावर त्यात दही टाकावे म्हणजे दूध फाटेल.
- मिश्रण गॅस वरून खाली उतरवावे.
- एका नॉनस्टिक तव्यावर साखर टाका.
- मंद आचेवर साखर कॅरॅमल होई पर्यंत परतत रहा.
- कॅरॅमल साखरेवर फाटलेले दूध टाकावे
- मध्यम आचेवर हे दूध आटेपर्यंत परतत रहा.
- दूध आटल्यावर त्यात वेलची पावडर, बदाम आणि पिस्ता टाका.
- एक प्लेट मध्ये तयार झालेला बेळगावी कुंदा (Belgavi Kunda) काढून त्यावर चांदीचा वर्ख लावून सर्व करा.
People Also Read : अय्यंगार स्टाइल रवा केक रेसिपी
बेळगावमधे कुंदा (Belgavi Kunda) बनवणारी दीडशेहुन अधिक दुकानं आहेत. राजस्थानमधून येऊन स्थायिक झालेल्या पुरोहित समाजाकडून मिठाईचा व्यवसाय केला जातो. बेळगाव भागात मिळणाऱ्या उत्तम प्रतीच्या दुधामुळे तिथे खवा हि उत्तम प्रतीचा मिळतो. बेळगावी कुंदा प्रसिद्ध होण्यात या खव्याचा सर्वात मोठा वाटा आहे. तुम्हीही वर दिलेली बेळगावी कुंदा रेसिपी (Belgavi kunda recipe) वापरून घरच्या घरी बेळगावी कुंदा बनवून पहा आणि पदार्थ कसा झाला ते आम्हालाही कळवा.