भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रिलायन्स जिओ ने आपला जिओबुक (लॅपटॉप) सादर केला आहे. ज्याची किंमत फक्त १६४९९ रुपये आहे. हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी प्री-बुक पर्याय आजपासून उपलब्ध आहे.
ज्यांना हा लॅपटॉप प्री-बुक करायचा आहे त्यांच्या साठी हा लॅपटॉप कसा आरक्षित करावयाचा याचे आम्ही मार्गदर्शन केले आहे.
जिओबुक लॅपटॉप : JioBook Launched
रिलायन्स रिटेलने सिम कार्ड नेटवर्क कनेक्टिव्हिटी सहीत, JioOS ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा सर्वांच्या बजेट मध्ये बसणारा असा लॅपटॉप (Jio Book 4G) लाँच केला आहे. वर्षभरापूर्वी केलेल्या घोषणेनंतर जिओ बुक आता प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे.
JioBook लॅपटॉप हा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्टोअरमधून खरेदी करता येईल.
JioBook ची किंमत ₹16,499 आहे आणि 5 ऑगस्ट रोजी बाजारात येणार आहे.
ग्राहक रिलायन्स डिजिटलच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स मधून तसेच Amazon ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह विविध चॅनेलद्वारे हा लॅपटॉप खरेदी करू शकतात.
JioBook ची वैशिष्ट्ये काय आहेत?
JioBook मध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे तो एक अत्यंत आकर्षक पर्याय बनतो. विशेषत: ज्यांना कमी खर्चात उत्तम लॅपटॉप हवा आहे त्यांच्या साठी हि उत्तम संधी आहे.
- कनेक्टिव्हिटी: 4G LTE आणि ड्युअल-बँड वाय-फाय (2.4GHz आणि 5.0GHz) सह उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
- प्रोसेसर: Mediatek MT 8788 Octa Core प्रोसेसर द्वारे समर्थित, 2.0 GHz क्लॉक, ARM V8-A 64-बिट आर्किटेक्चरवर हा लॅपटॉप चालतो.
- मेमरी: या लॅपटॉप मध्ये 4GB LPDDR4 RAM आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तम यूजर एक्सपेरियन्स मिळतो.
- स्टोरेज: या लॅपटॉप मध्ये 64GB अंतर्गत स्टोरेज असून SD कार्डद्वारे 256GB पर्यंत हे स्टोरेज वाढवता येते.
- कॅमेरा: व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉन्फरन्स साठी 2MP वेब कॅमेरा दिलेला आहे.
- डिस्प्ले: 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह 29.46 सेमी (11.6-इंच) अँटी-ग्लेअर HD डिस्प्ले आहे
- वजन: लॅपटॉप चे वजन फक्त 990gms असून कुठेही घेऊन जाण्यास उत्तम आहे.
- JioOS : JioBook हे JioOS वर चालते. JioOS मध्ये 75 पेक्षा जास्त शॉर्टकट, नेटिव्ह अॅप्स, विस्तारित डिस्प्ले सपोर्ट, टचपॅड जेश्चर आहेत.
- बॅटरी लाइफ: JioBook लॅपटॉप 8 तासांपेक्षा जास्त बॅटरी बॅकअपचे देतो.
- कीबोर्ड आणि टचपॅड: JioBook मध्ये इन्फिनिटी कीबोर्ड आणि मोठा टचपॅड आहे.
JioBook कसे खरेदी करावे?
तुम्ही तुमच्या जिओबुकचे आरक्षण खालील स्टेप्स वापरून सहजतेने करू शकता.
- जिओ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.jiobook.com वर जा किंवा साइटवर प्रवेश करण्यासाठी येथे क्लिक करा.
- तुमचा पसंतीचा प्लॅटफॉर्म निवडा: जिओ च्या वेबसाइटवर तुम्हाला JioBook कुठून करायचा आहे या बद्दल पर्याय मिळेल. तुमच्या आवडीनुसार, रिलायन्स जिओ डिजिटल्स किंवा अॅमेझॉनवर खरेदी काण्यास दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा.
- तुमची ऑर्डर द्या: तुम्ही Reliance Jio Digitals निवडल्यास, तुम्हाला पेजवर “आता प्री-ऑर्डर” बटण दिसेल. त्यावर क्लिक करा, परंतु त्याआधी अजून काही ऑफर असल्यास तपासून घ्या.
- वितरण/डिलिव्हरी आणि पेमेंट तपशील: लॅपटॉप वितरणासाठी तुमची आवश्यक माहिती भरा आणि पेमेंट करा. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 12:00 वाजता लॅपटॉप चे डिस्पॅच सुरू होईल.
टीप: काही पिन कोड सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध नसतील.
JioBook चे सिम कसे सक्रिय करायचे?
JioBook सिमसोबत प्री-इंटिग्रेटेड आहे. सिम सक्रिय करण्यासाठी दोन पर्याय आहेत:
- होम अॅक्टिव्हेशन: नवीन सिम कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी Jio च्या वेबसाइटला भेट द्या किंवा MyJio मोबाइल अॅप वापरा. त्यानंतर एक जिओ एक्झिक्युटिव्ह तुमच्याशी संपर्कात राहून अॅक्टिव्हेशनसाठी होम व्हिजिट शेड्यूल करेल.
- Jio Store सक्रियकरण: तुम्ही तुमच्या जवळच्या जिओ स्टोअर्सवर जाऊन JioBook चे सिम सक्रिय करू शकता. झटपट सक्रिय होण्यासाठी तुमचे JioBook जवळच्या जिओ स्टोअरमध्ये घेऊन जा.
Hi there, just became alert to your blog through Google, and found
that it is truly informative. I’m going to watch out for brussels.
I will be grateful if you continue this in future.
Lots of people will be benefited from your writing.
Cheers! Najlepsze escape roomy
Very interesting points you have remarked,
thank you for posting.!
Very interesting info!Perfect just what I was
looking for! Euro trip
May I just say what a comfort to discover a person that actually understands what they are talking about on the net. You certainly realize how to bring a problem to light and make it important. More people really need to look at this and understand this side of your story. I can’t believe you aren’t more popular since you surely have the gift.
After I initially commented I seem to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now whenever a comment is added I get four emails with the same comment. Perhaps there is a way you are able to remove me from that service? Thanks.