महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना 2023 : मुलींना शिक्षणासाठी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार (Maharashtra Lek Ladaki Yojana 2023)

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना काय आहे ? याच्या साठी काय पात्रता आहे? सदर योजने साठी कोणते कागदपत्र लागतील? ऑनलाईन अर्ज कसा करावयाचा ? याची सर्व माहिती मिळेल (Maharashtra Lek Ladki Yojana 2023 in Marathi) (Eligibility, Documents, Registration, Online Appllication process, Official Website, Helpline Number, Beneficiary)

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात, मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना (Maharashtra Lek Ladaki Yojana 2023) असे या नव्या योजनेचे नाव असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. आर्थिक अडचणींमुळे कित्यके गरीब कुटुंबातील मुली शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना रोजगार न मिळाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही. महाराष्ट्र सरकारच्या या योजने मुळे गरीब घरातील मुलींनाही आपले शिक्षण सुरु ठेवता येईल. मुलींना सशक्त, प्रबळ व आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. या योजेने अंतर्गत मुलींना ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. सदर योजनेत आणखी कोणते फायदे असतील याबद्दल माहिती या लेखाद्वारे तुम्हाला मिळेल.

Lek Ladaki Yojana 2023

योजनेचे नावमहाराष्ट्र लेक लाडकी योजना २०२३
राज्य/केंद्र सरकारमहाराष्ट्र राज्य सरकार
कधीपासून सुरुमहाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३-२०२४
लाभार्थीमहाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुली
सरकारचे उद्दिष्टगरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण देण्याचे उद्दिष्ट
मदतीचे स्वरूपमुलीच्या जन्मापासून, तिच्या शिक्षणासाठी वयाच्या १८ वर्षापर्यंत आर्थिक मदत
एकूण मदत रक्कम७५हजार रुपये

लेक लाडकी योजना उद्दिष्ट (Lek Ladaki Yojana Objective)

महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना ही योजना २०२३ पासून सुरू केली आहे. कित्येक गरिब घरातील मुलींना, आर्थिक अडचणीमुळे काही वेळेस शिक्षण घेता येत नाही. अशिक्षित असल्याने चांगला रोजगार मिळू शकत नाही आणि त्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत. अशा मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे आणि त्यांच्या कुटुंबावरही याचा भार पडू नये यासाठी महाराष्ट्र्र सरकार तर्फे ही योजना सुरु करण्यात आली आहे.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक पात्रता ( Eligibility for Lek Ladaki Yojana Scheme)

  • लेक लाडकी योजना (Lek Ladaki Yojana) महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे रेशनकार्ड, हे पिवळ्या किंवा केशरी रंगाचे असावे.
  • समाजातील दुर्बल वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.

Lek Ladaki Yojana-2023

योजनेअंतर्गत देण्यात येणारी आर्थिक सहायता

महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून, गरीब कुटुंबातील मुलींना सशक्त व आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्या लहानपणापासून ते वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत शासनाकडून खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्या नुसार आर्थिक मदत करण्यात येते;

  • मुलीच्या जन्मानंतर पात्र कुटुंबाला ५००० रुपये इतकी मदत आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येईल.
  • मुलगी मोठी झाल्यानंतर, शालेय शिक्षणासाठी इयत्ता पहिलीमध्ये जायला लागल्यावर, शासनाकडून ४००० रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
  • मुलगी इयत्ता सहावीमध्ये गेल्यावर तिला शासनाकडून ६००० रुपये देण्यात येतील.
  • जर मुलगी इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असेल, तर त्यासाठी शासनाकडून ८००० रुपये देण्यात येतील.
  • मुलीचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शासनाकडून ७५००० रुपये देण्यात येतील.

लेक लाडकी योजना कागदपत्रे (Required Documents)

  • मुलीचा जन्माचा पुरावा
  • आई वडिलांचे आधार कार्ड.
  • मुलीचे आधारकार्ड
  • स्थानिक रहिवाशी प्रमाणपत्र
  • मुलीची शैक्षणिक कागदपत्रं
  • कौटुंबिक रेशनकार्ड (पिवळा किंवा केशरी)
  • उत्पन्नाचा दाखला

लेक लाडकी योजना अर्ज कुठे व कसा करायचा ? (Online Application Process)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर करताना लेक लाडकी या योजनेची माहिती दिली; परंतु अद्याप या योजनेअंतर्गत Online Registration अथवा lek ladki yojana online फॉर्म देण्यात आलेला नाही. तसेच अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिकृत पोर्टल अथवा वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा ऑफलाईन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवरती याची माहिती देण्यात येईल.

लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट लिंक

योजनेची अधिकृत वेबसाईट अजून तयार करण्यात आलेली नाही. अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा ऑफलाईन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवरती याची माहिती देण्यात येईल. लेक लाडकी योजना साठी Online किंवा Offline पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरणे सुरू झाल्यानंतर, पात्र लाभार्थी मुलींना अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करताना, वर नमूद केलेलं सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ असणे महत्वाचे आहे.

वेबसाइटला भेट द्या

महाराष्ट्र सरकारची, लेक लाडकी योजना काय आहे ?

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनामार्फत २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेली असून, या मध्ये गरीब कुटुंबातील मुलींना शासनाकडून शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

लेक लाडकी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना, ही फक्त महाराष्ट्र राज्यातील पात्र लाभार्थी मुलींसाठीच लागू आहे.

महाराष्ट्र सरकार कडून लेक लाडकी योजनेअंतर्गत किती मदत केली जाते ?

महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेअंतर्गत, मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत शासनाकडून जवळपास ७५००० रुपयाची आर्थिक मदत केली जाते.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

शासनातर्फे लेक लाडकी योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली असल्यामुळे, अर्जासाठीची ऑनलाइन अथवा ऑफलाईन प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, याबद्दलची माहिती लवकरच देण्यात येईल.

2 thoughts on “महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना 2023 : मुलींना शिक्षणासाठी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार (Maharashtra Lek Ladaki Yojana 2023)”

  1. You really make it seem really easy along with your presentation but I in finding this topic
    to be actually something which I believe I would by no means understand.
    It seems too complicated and very huge for me. I am
    taking a look forward on your subsequent post, I
    will attempt to get the grasp of it! Escape room lista

    Reply

Leave a comment