विदर्भ स्पेशल सांबार वडी-पुडाची वडी : Sambar vadi recipe in marathi-2023

पावसाळा असो किंवा उन्हाळा, आपल्या कडे कोथिंबीर बारा महिने मिळते. आज आपण याच कोथिंबिरीचा वापर करून, विदर्भात बनवली जाणारी सांबार वडी (Sambar vadi recipe) कशी बनवायची हे पाहूया.

विदर्भ स्पेशल सांबार वडी : Sambar vadi recipe in marathi

विदर्भात कोथिंबिरीला सांबार म्हटले जाते. त्यामुळे कोथिंबीर वापरून बनवलेली कोथिंबीर वडी, म्हणजेच सांबार वडी. याच सांबार वडी ला काही जण पुडाची वडी असेही म्हणतात. घरच्या घरी, गृहिणीला सहज बनवता येणारी ही रेसिपी आहे. चला तर मग सांबार वडी रेसिपी (Sambar vadi recipe) वापरून चविष्ट सांबार वडी कशी बनवायची हे पाहूया.

Sambar Vadi

People Also Read : अनारसे रेसिपी

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ४० मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण

Sambar Vadi

साहित्य: Ingredients

  • दोन वाटी मैदा
  • एक वाटी दाण्याचा कूट
  • दोन वाटी चिरलेली कोथिंबीर
  • एक चमचा हळद
  • दोन चमचे तिखट
  • अर्धा चमचा आमचूर पावडर
  • एक चमचा साखर
  • 1/2 चमचा ओवा
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा खसखस
  • अर्धा चमचा तीळ
  • दोन चमचे आले हिरवी मिरचीची पेस्ट
  • 1/2 चमचाचा बडीशेप
  • चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल.

Sambar Vadi

कृती: Cooking Instructions

  • दोन वाटी मैदा, चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ असे सर्व एकत्रित करावे
  • या मिश्रणात लागेल तेवढे पाणी घालून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यावा
  • आता हा गोळा, पंधरा मिनिटात करता बाजूला ठेवावा.
  • वडीच्या सारणासाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप, दोन चमचे आले मिरचीची पेस्ट, एक चमचा तेलावर पाच मिनिटात करता भाजून घ्यावे.
  • आता त्यामध्ये तिखटमीठ, हळद, आमचूर पावडर, साखर टाकून हे सर्व दोन मिनिटा करता परतून घ्यावे.
  • त्यामध्ये दाण्याचा कूट टाकून सर्व मिश्रण परतून घ्यावे.
  • या मिश्रणात, चिरलेली कोथिंबीर टाकून त्याचे सारण तयार करावे.
  • मैद्याच्या पिठाचे छोटे गोळे लाटून घ्यावे.
  • या गोळ्याची लाटी करून त्यात सारण भरून दोन्ही साईडने बंद करून त्याचा रोल तयार करून घ्यावा.
  • या रोलच्या कडेला पाणी लावून तो रोल व्यवस्थित दाबून घट्ट करून घ्यावा.
  • एका कढईमध्ये तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर तापवून घ्यावे.
  • आता या तेलात, वर बनवलेले रोल (सांबार वडी) हलक्या हाताने सोडावीत.
  • सांबार वडी, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्याव्यात.
  • एका प्लेट मध्ये टिशू पेपर ठेवून त्यावर या वड्या काढून घ्याव्यात.
  • गरमागरम सांबार वडी खायला देताना , सॉस / चिंचेची चटणी/ तळलेल्या हिरव्या मिरची सोबत सर्व्ह करावी

Sambar Vadi

People Also Read : बेळगावी कुंदा रेसिपी

काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips

  • बाजारातून आणलेली कोथिंबीर नीट निवडून आणि धुवून घ्यावी
  • धुतलेली कोथिंबीर एका कोरड्या कपड्यावर पसरवावी .
  • थोडा पाणी शोषल्या गेल्यावर मग ती बारीक चिरून घ्यावी.
  • कोथिंबीरच्या काड्या लक्ष पूर्वक बारीक चिराव्या .
  • जर सांबार वड्या आधी करून मग एकत्र तळायच्या असल्यास, सांबार वड्या ओल्या कपड्याने झाकून ठेवाव्यात म्हणजे त्या सुकून कडक होणार नाही.
  • समजा वडी करताना फुटली किवा तिच्या कडा उमलल्या सारखी वाटल्या, तर एक चमचा डाळीचे पीठ पाण्यात कालवून, ते पाणी वडीच्या कडांना लावावे आणि त्यानंतर वडी तळावी.
  • वडीचे सारण आदल्या दिवशी सुद्धा बनवून ठेवता येते.
  • फक्त दुसऱ्या दिवशी वड्या करण्या पूर्वी त्यात थोडी फ्रेश कोथिंबीर चिरून घालावी.
Sambar Vadi

वर दिलेली सांबार वडी ची रेसिपी (Sambar vadi recipe) वापरून तुम्ही ही घरच्या घरी ही वडी बनवा आणि कशी झाली ते आम्हालाही कमेंट करून कळवा.

2 thoughts on “विदर्भ स्पेशल सांबार वडी-पुडाची वडी : Sambar vadi recipe in marathi-2023”

Leave a comment