डाळिंब्या वालाचे मुटगे : Dalimbi Valache Mutge recipe

कोंकणातील लोकांना वालाचे महत्व सांगायला नको. सोललेले कडवे वाल म्हणजेच वालाच्या डाळिंब्या. या डाळींब्याचा वापर करून आज आपण डाळिंबीच्या वालाचे मुटगे (Dalimbi Valache Mutge recipe) कसे बनवायचे हे पाहूया

पारंपारिक पद्धतीने डाळिंब्या वालाचे मुटगे- Dalimbi Valache Mutge

कोंकणात वालाची भाजी किंवा उसळ सर्वत्र आवडीने खाल्ली जाते. अलिबाग येथील कडवे वाल सर्वञ प्रसिद्ध आहेत. श्रावण महिन्यात किंवा गणेशोत्सवात वालाचे बिरडे हमखास बनवले जातेच. काही जणांसाठी वालाचे बिरडे म्हणजे जीव कि प्राण असतो.या वालाची खिचडी हि बनवली जाते. तर आज आपण, कडवे वालाच्या डाळिंबीचे चविष्ट मुटगे (Dalimbi Valache Mutge) घरच्या घरी सहजतेने कसे बनवायचे हे पाहूया.

Dalimbi Valache Mutge

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ४० मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण

साहित्य: Ingredients

 • दोन वाटी बासमती तांदळाचे पीठ
 • एक वाटी सोललेले डाळिंबी वाल
 • थोडीशी हळद व हिंग
 • बारीक चिरलेला कांदा
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • बारीक चिरलेली मिरची
 • कढीपत्ता पाने
 • चवीपुरते मीठ
 • चिमुटभर साखर
 • आले लसूण पेस्ट (ऐच्छिक)
 • तेल व पाणी
 • एका लिंबाचा रस
 • केळीचे पान

Dalimbi Val

People Also Read : ड्रायफ्रूट मोदक रेसिपी (Dryfruit Modak Recipe)

कृती: Cooking Instructions

 • कडवे वाल राञभर भिजवत ठेवा.
 • सकाळी सारे वाल बाहेर काढून चांगले धुवून घ्या.
 • सोललेले वाल, थोड्याशा पाण्यात मीठ घालून पंधरा-वीस मिनिटे उकळून घ्या
 • त्यामुळे हे वाल थोडे मऊसर होतील
 • आता तांदळाच्या पीठाला, थोडे तेल व मीठ घातलेल्या गरम पाण्यात मिक्स करून, मोदकासाठी काढतो तशी उकड काढून घ्या.
 • एका पसरट परातीमधे हीच बनवलेली उकड काढून घ्या
 • आता त्यात हळद,हिंग,मिरची, कोथिंबीर,कांदा,कढीपत्ता, मीठ, साखर,आलेलसूण पेस्ट हे सर्व साहित्य एकत्र करा
 • त्यावर तेलाचा हात लावून हे पीठ चांगले मऊसर मळा.
 • आता हे मळलेले पीठ साधारणतः पंधरा मिनिटे उमलण्यास ठेवा.
 • मोदकपात्र तयार करून गॅस वर ठेवा.
 • उकड काढायच्या जाळीदार भांड्याला तेलाचा हात लावून ठेवा
 • त्यावर केळीचे पान पसरवा
 • आता मुटगे बनवण्यासाठी तेलाच्या हाताने ,मळलेल्या पीठाचा एक गोळा करा
 • एका हाताच्या तळहातावर या गोळा घेवूनत्यावर हाताचा दाब देऊन त्याला चपटा करा व त्यावर हाताची चार बोटे हलकेच दाबा.
 • हाताच्या मुठीमधे दाबून त्याला हाताच्या मुठीचा आकार द्या
 • सारे मुटगे बनवून, मोदकपात्रात दहा ते पंधरा मिनिटे वाफेवर उकडून घ्या.
 • मोदकपात्रातून मुटगे भांड्यातून काढून घ्या.
 • टाॅमेटो साॅस किंवा ओल्या चटणी सोबत गरमागरम मुटगे खाण्यासाठी सर्व्ह करा.
 • हे मुटगे, तुम्ही गरमागरम आले-वेलची चहा सोबत ही खाऊ शकता.

Dalimbi Valache Mutge recipe

काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips

 • आवडत असल्यास, तुम्ही मुटग्यांवर तेलात तडतडलेल्या बारीक मोहरी व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा तडका पण देऊ शकता.
 • जर घरी वाल उपलब्ध नसतील तर, उकडलेले मुग किंवा मटार वापरून हि रेसिपी तुम्ही करू शकता.

वर दिलेली डाळिंब्या वालाचे मुटगे रेसिपी (Dalimbi Valache Mutge recipe) वापरून तुम्हीही घरच्या घरी मुटगे बनवा आणि कसे झाले ते आम्हालाही कमेंट करून कळवा.

Leave a comment