कोथिंबीर वडी बनवायची आहे? काळजी नको, आम्ही तुम्हाला कोथिंबीर वडी ची रेसिपी (Kothimbir Vadi recipe) देतो, म्हणजे तुम्हीही हि स्वादिष्ट आणि कुरकुरीत वडी अगदी सहजतेने घरी बनवू शकाल. घरच्यांकडून तुम्हाला नक्कीच उत्तम सुगरणीचा मान मिळेल.
कोथिंबीर वडी : Kothimbir Vadi
श्रावण महिना सुरु झाला कि वेगवेगळ्या सणांची सुरवात होते. त्यात कित्येक लोकांचा गणेशोत्सव पर्यंत शाखाहारी खाण्याकडे कल असतो. अशा वेळेस घरच्या गृहिणीला वेगवेगळे शाकाहारी पदार्थ बनवून घरच्या लोकांना खुश करता येते. या वेळे पर्यंत बाजारात भाज्याही बऱ्याच प्रकारच्या येत असतात. उत्तम सुगरण गृहीणी नेहमीच काही तरी चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ करण्याचा प्रयत्न करत असते. बाजारात त्यावेळेस सहज उपलब्ध होणारी कोथिंबीर , अळूची पाने या पासून वड्या तयार करून आपल्या कुटुंबियांना खायला घालते. तर आज आपण, घरच्या घरी सहजतने बनवता येणारी , सगळ्यांच्या आवडीची स्वादिष्ट आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi recipe) कशी बनवायची हे पाहणार आहोत.
People Also Read : काकडीचे घारगे रेसिपी : Kakdiche Gharge Recipe
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | २०-३० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | २०-३० मिनिटे |
किती जणांना पुरेल | २-४ जण |
साहित्य: Ingredients
कोथिंबीर वडी बनवायला लागणारे साहित्य ;
- एक मोठी जुडी कोथिंबीर
- एक मोठा कप बेसन
- १/४ कप तांदूळ पीठ
- ३-४ मिरच्या
- एक मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा
- १ टीस्पून तीळ
- १ टीस्पून जीरे
- १ टीस्पून बेडगी मिरची पावडर
- १/२ टीस्पून हळद पावडर
- चवीपुरते मीठ
- चिमुटभर साखर
People Also Read : बेळगावी कुंदा रेसिपी
कृती: Cooking Instructions
- सर्वप्रथम धुतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घ्यावी.
- हिरव्या मिरच्या आणि आले तुकडा मिक्सर मधून थोडासा जाडसर वाटून घ्यावे.
- कोथिंबीर, आले मिरचीचे भरड आणि वर दिलेले इतर साहित्य एकत्र करावे.
- आता हे सर्व मिश्रण पाणी न घालता व्यवस्थित मिसळून घ्यावे.
- या मिश्रणाचा एक चांगला गोळा मळून घ्यावा.
- गोळा मळताना, किंचित थोडे पाणी घेऊन मऊसर गळा बनवावा.
- आता त्यावर थोडासा तेलाचा हात लावून वळीच्या आकारात लांबट गोळा बनवा.
- मोदकपात्राचे भांडे घेऊन त्याला तेलाचा हात लावावा.
- आता या भांड्यात कोथिंबीर वड्या २० मिनिटे उकडून घ्याव्यात.
- वड्या थंड झाल्यावर लांबट गोळ्याचे तुकडे पाडून घ्यावेत.
- पॅन मध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर वड्या चांगल्या तळून घ्याव्यात.
- उरलेला गोळा फ्रिज मध्ये ठेवून द्यावा, आणि १-२ दिवसात पुन्हा वड्या करून सर्वाना द्याव्यात.
काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips
- बाजारातून कोथिंबीर आणल्यावर, सर्वप्रथम स्वच्छ पाने निवडून घ्या.
- निवडलेली कोथिंबीर स्वच्छ पाण्यात व्यवस्थित धुवा आणि मग एका स्वच्छ कापडावर, पाणी निथळून जाण्यासाठी ठेवून द्या.
- तांदळाचे पीठ वापरल्याने कोथिंबीर वड्या खुसखुशीत होतात.
- कोथिंबीर वडी उकडून ही खाऊ शकतात, तुम्हाला हवे असल्यास डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून ही खाऊ शकता.
People Also Read : अनसा-फणसाची भाजी
तर अश्या रीतीने तुम्ही कोथिंबीर वडी रेसिपी (Kothimbir Vadi recipe) वापरून अगदी सहज स्वादिष्ट आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी घरच्या घरी बनवू शकता. ही वडी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हालाही कळवा.
Easy receipe, will try
You really make it seem so easy along with your presentation however I
find this matter to be really one thing that
I think I’d never understand. It seems too complex and very large for me.
I’m taking a look forward on your subsequent put up, I will attempt to get the hang of it!
Lista escape room
I was looking through some of your articles on this
website and I believe this site is really informative!
Continue posting..
You have mentioned very interesting details! ps decent website.
Travel guide
I’m happy that you just shared this useful info with us.
You have made some really good points there. I checked on the internet for more information about the issue and found most individuals will go along with your views on this website.