आता घरीच बनवा थंडाई,स्पेशल थंडाई रेसिपी: Homemade Special Dryfruit Thandai Recipe in Marathi

आता घरीच बनवा स्पेशल सुकामेवा थंडाई (Special Dryfruit Thandai Recipe). बाजारातून न आणता, स्वतः बनवा सहज आणि सोप्या पद्धतीने स्पेशल थंडाई. गरमीच्या दिवसात थंडाई म्हटले की सर्वाना गारगार झाल्यासारखे वाटते. उन्हाळ्याच्या दिवसात, जर थंडगार थंडाई दिली, तर त्याचा आस्वाद आबालवृद्धांपासून सर्वजण आनंदाने घेतात, अर्थात जर तुम्हाला मधुमेह असेल तर मात्र जपूनच… आज आपण घरच्या घरी, सुकामेवा पासून थंडाई कशी बनवणार हे पाहणार आहोत. तुम्ही हि रेसिपी वापरून घरी बनवून पहा सुकामेवा स्पेशल थंडाई (Special Dryfruit Thandai Recipe) ….

Special Dryfruit Thandai

सुकामेवा स्पेशल थंडाई : Special Dryfruit Thandai

उन्हाळ्यात किंवा शक्यतो होळीच्या सणानिमित्त, आजकाल सर्वत्र थंडाई बाजारातून आणून प्यायली जाते. जर बाजारात न जाता, घरीच थंडाई बनवली तर आपल्याला आवडते त्या पद्धतीने आपण थंडाई बनवू शकतो. तर आज सुकामेवा वापरून थंडाई (Special Dryfruit Thandai Recipe) कशी बनवायची हे पाहूया.

Special Dryfruit Thandai

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ४० मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण

Special Dryfruit Thandai

हे पण वाचा: काला जामून रेसिपी

थंडाई मसाला रेसिपी: Special Dryfruit Thandai Masala Recipe

साहित्य: Ingredients

थंडाई मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे;

  • १/२ वाटी काजू
  • १/२ वाटी पिस्ता
  • १ वाटी बदाम
  • १/४ वाटी मगज
  • ८-१० सुकलेल्या गुलाबपाकळ्या
  • १ टीस्पून काळेमिरे
  • ४ टीस्पून बडीशेप
  • बादियान पावडर (चक्रीफूल पावडर)
  • केशर काड्या
  • वेलची, दालचिनी (आवडीनुसार)
  • दुध
  • साखर

Special Dryfruit Thandai

Special Dryfruit Thandai

कृती: Cooking Instructions

  • थंडाई बनवण्यासाठी सुकामेवा भरपूर वापरावा. लहान मुलांनाही तो खायला आवडतो.
  • वर दिलेल्या साहित्यातील बदाम, काजू, पिस्ता, मगज, गुलाब पाकळ्या, केशर काड्या हे सर्व पदार्थ मिक्सर मध्ये टाकून बारीक करून घ्यावे.
  • मिक्सर एकदाच फिरवून न घेता थोड्या थोड्या अंतराने फिरवत सुकामेवा बारीक करून घ्यावा.
  • आता ही सुकामेवाची पावडर एका प्लेट मध्ये काढून ठेवा.
  • मिक्सरमध्ये, थोडीफार कुटलेली वेलची, दालचिनी, बडीशेप, काळेमिरे आणि बादियान (चक्रफुल) पावडर घालून हे मिश्रण अगदी बारीक करून घ्या.
  • आता प्लेट मधली सुकामेवा पावडर मिक्सरमधील मिश्रणात टाकून पुन्हा एकदा मिक्सर मधून बारीक करून घ्यावी.
  • अशा रीतीने तुमच्या थंडाई साठी घरगुती थंडाई मसाला तयार आहे.
  • एका ग्लासात कोमट दूध घ्यावे आणि त्यात ३-४ चमचे थंडाई मसाला टाका.
  • एका चमच्याने दूध चांगले ढवळून, थंडाई मसाला मिक्स करून घ्यावा.
  • एका भांड्यात एक ग्लास थंड दूध घेऊन त्यात हवी तेवढी साखर टाकून, चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • आता कोमट दूध, या साखरमिश्रित दुधात मिक्स करावे आणि फ्रिज मध्ये थोड्या वेळासाठी थंड करत ठेवावे.
  • दूध थंड झाल्यावर त्यावर बदाम-पिस्ताचे तुकडे, गुलाबपाकळ्या टाकून सर्व्ह करावे.
  • सुकामेवा वापरून घरी बनवलेली स्पेशल थंडाई (Special Dryfruit Thandai) तयार आहे.


हे पण वाचा : काकडीचा केक-काकडीचा धोंडस

थंडाई पेस्ट रेसिपी: Thandai Paste Recipe

साहित्य: Ingredients

थंडाई मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे;

  • १/२ वाटी बदाम
  • १/४ वाटी पिस्ता
  • १/४ वाटी काजू
  • १/४ वाटी मगज
  • १/४ टीस्पून काळेमिरे
  • २ टीस्पून बडीशेप
  • चिमूटभर बदियान (चक्रफुल) पावडर
  • ५-६ वेलदोडे
  • गुलाबपाकळ्या
  • केशर काड्या
  • दुध
  • साखर
Special Dryfruit Thandai

कृती: Cooking Instructions

  • एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात १/२ वाटी बदाम आणि १/४ वाटी पिस्ता अर्धा तास भिजत टाकावे.
  • पाणी थंड झाल्यावर बदाम आणि पिस्त्याची साले काढून टाकावीत.
  • १/४ वाटी काजू,१/४ वाटी मगज, गुलाबपाकळ्या घेऊन कोमट पाण्यामधे अर्धा ते एक तास भिजत ठेवा.
  • आता भिजवलेले वरील सर्व सुकामेवा एकत्र करून त्यामध्ये केशर काड्या, थोडे दुध आणि थोडीशी साखर घालून सर्व मिश्रण बारीक करून घ्यावे.
  • १/४ टीस्पून काळेमिरे, २ टीस्पून बडीशेप, चिमूटभर बदियान (चक्रफुल) पावडर, ५-६ वेलदोडे एकत्र करून बारीक पावडर करून घ्यावी.
  • आता हि पावडर वर केलेल्या सुक्यामेवाच्या पेस्ट मध्ये मिक्स करून घ्यावी.
  • कोमट दुधात हवी तेवढी साखर आणि थंडाई पेस्ट एकत्र करून चांगली मिक्स करून घ्यावी. आता हे कोमट दूध/पेस्ट अर्धा तास बाजूला ठेवावे.
  • थंडाई बनवताना, एका ग्लासमध्ये थंड दूध घेऊन एक टीस्पून थंडाई पेस्ट मिसळून चांगली एकजीव करावी.
  • एकजीव झाल्यावर १-२ बर्फाचे खडे,गुलाबपाकळ्या, बदामाचे काप टाकून सगळ्यांना सर्व्ह करावी.

Special Dryfruit Thandai

काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips

  • वर दिलेल्या स्पेशल थंडाई रेसिपी (Special Dryfruit Thandai Recipe) वापरून बनवलेला थंडाई मसाला फ्रिज मध्ये ठेवावा.
  • फ्रिजमधे थंडाई मसाला १-२ महिने राहतो.
  • मिक्सरमध्ये एकदाच खुप वेळ फिरवल्यास, सुकामेव्यामधील तेल निघून गेल्यास, पावडर तेलकट होऊ शकते.
Special Dryfruit Thandai

वर दिलेली स्पेशल थंडाई रेसिपी (Special Dryfruit Thandai Recipe) वापरून तुम्ही ही अगदी सहजतेने, सुकामेवा वापरून स्पेशल थंडाई घरी बनवून पहा आणि थंडाई कशी झाली ते आम्हालाही कमेंट करून कळवा.