काकडीचा केक कसा बनवायचा? काही काळजी करू नका, ही घ्या घरच्या घरी सहजतेने काकडीचा केक बनवायची रेसिपी (Kakdicha Cake Recipe). या काकडीच्या केक ला, काही ठिकाणी काकडीचे धोंडस किंवा काकडीचे सांधण असे ही म्हटले जाते.
काकडीचा केक – काकडीचा धोंडस : Kakdicha Cake
केक आवडत नाही असा माणूस सापडणे जवळजवळ अशक्यच आहे. बाजारात इतक्या प्रकारचे केक मिळतात, तरीही उत्तम सुग्रण असलेली गृहिणी स्वतःच्या हाताने घरीच केक बनवते. काकडीचा केक ( Cucumber Cake) हा जरी वेळखाऊ प्रकार असला तरीही त्याची चव खूप छान असते. हा केक अबालवृद्ध कुणीही खाऊ शकतात. चला तर स्वादिष्ट काकडीचा केक रेसिपी (Kakdicha Cake Recipe) वापरून घरच्या घरी हा केक बनवूया
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | १ तास |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | २ तास |
किती जणांना पुरेल | २-४ जण |
People Also Read : बेळगावी कुंदा रेसिपी
साहित्य: Ingredients
• एक वाटी लापशी रवा
• दिड वाटी गुळ
• दोन वाटी मोठ्या गावरान काकडीचा कीस
• एक वाटी शेंगदाणे
• एक वाटी मनूका
• एक वाटी सुक्या खोबरेचे अगदी पातळ कापलेले तुकडे
• एक चमचा हिरवी वेलची पावडर
• चवीपुरते मीठ
• चिमुटभर साखर
• दोन वाट्या तेल
• अर्धी वाटी तुप
कृती: Cooking Instructions
- जाड लापशी रवा नीट निवडून घ्यावा.
- आता निवडलेला लापशी रवा, थोड्याश्या पाण्यात तासभर भिजवून ठेवा
- तोपर्यंत गूळ चिरुन घ्यावा आणि गावरान काकडी किसून घ्यावी
- रवा उमलल्यावर, त्यात चिरलेला गुळ व बारीक किसलेला काकडीचा कीस टाकावा,
- वरील मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.
- आता या मिश्रणात एक वाटी शेंगदाणे, एक वाटी मनूका, एक वाटी सुक्या खोबरेचे अगदी पातळ कापलेले तुकडे (तुम्हाला हवे असल्यास बदामाचे पातळ काप वापरू शकता) आणि एक चमचा हिरवी वेलची पावडर , चवीपुरते मीठ व चिमुटभर साखर घालून पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- आता हे सर्व मिश्रण दिड ते दोन तास झाकून मुरवत ठेवा.
- कोळसे पेटवून त्याचे निखारे करण्यास ठेवून द्यावेत.
- गॅस वर एक जाड बुडाचे पातेले घेऊन ते गरम करून घ्यावे.
- पातेले गरम झाल्यावर गॅस बंद करून घ्यावा.
- आता या पातेल्यात तेल अथवा तूप टाकावे .
- आता हे पातेले वरखाली फिरवून, त्यातील तेल/ तुप सर्व बाजूला लागेल असे पसरवून घ्यावे.
- या पातेल्यात हे भिजवत ठेवलेले मिश्रण टाकावे आणि व्यवस्थित पसरवून घ्यावे.
- पातेल्यावरती परातीचे झाकण ठेवून, मंद आचेवर काकडीचा केक शिजवत ठेवा.
- अर्ध्या तासाने झाकण काढून सूरी किंवा चमचा टाकून केक नीट शिजला आहे का ते पाहावे.
- जास्तीचे तेल वर आले असेल, ते सगळे काढून घ्यावे.
- आता पातेले पुन्हा परातीने झाकून मंद आचेवर केक शिजवत ठेवा.
- कोळशाचे पेटते तयार निखारे परातीवर ठेऊन द्या.
- साधारणपणे, दिड ते दोन तासात मऊ चवदार काकडी केक (Kakdicha Cake) तयार होतो.
- केक नीट शिजल्यावर गॅस बंद करावा आणि केक थोडा थंड होऊ द्यावा.
- एका पसरट ताटात केकपात्र/पातेले उपडे करावे.
- तुम्ही बनवलेला काकडीचा केक खाण्यासाठी तयार आहे.
काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips
- केक जास्त जळू नये म्हणून, गॅसवर जाड तवा ठेऊन मग त्यावर केकचे पातेले ठेवा.
- केक करताना वर आलेले जास्तीचे तेल तुम्ही स्वयंपाकास वापरू शकता
- शक्यतो जाड बुडाचे पातेले घ्यावे म्हणजे केक करपत नाही
- काकडीचा केक (Kakdicha Cake) चुलीवर बनवल्यास त्याची चव अजूनच वाढते.
- तुम्हाला हवे असल्यास बदामाचे पातळ काप वापरू शकता.
वर दिलेली काकडीच्या केकची रेसिपी (Kakdicha Cake Recipe) वापरून, तुम्ही सुद्धा हा केक अगदी सहजतेने बनवू शकता. तर नक्की बनवून पहा आणि केक कसा झाला ते आम्हालाही कमेंट करून कळवा.
Traditional Nice receipe