नव्या नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : 101+ Special Marathi Ukhane-Navari-Bride-Female

महाराष्ट्रात नवीन लग्न झालेल्या नवरीला, नेहमीच आग्रहाने आपल्या पतीचे नाव घ्यायला सांगतात. हे नाव नुसती हाक न मारता एका विशिष्ट पद्धतीने घेतले जाते आणि यालाच “उखाणे” (Marthi Ukhane) म्हटले जाते. आज आम्ही नव्या नवरी साठी काही स्पेशल उखाणे (Special Marathi Ukhane-Navari-Bride-Female) देत आहोत.

Table of Contents

नव्या नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

महाराष्ट्रात नव्या नवरीला नेहेमीच आपल्या पतीचे नाव उखाण्यात घ्यायला सांगितले जाते. कित्येक वेळेस सत्यनारायण पूजा (Satynarayan Pooja) असेल, गणेशोत्सव (Ganesh Festival), मंगळागौर (Mangalagaur), अशा अनेक प्रसंगी नव्या नवरीला किंवा तिथे उपस्थित असलेल्या स्त्रियांना उखाणे (Marathi Ukhane) घेण्याचा आग्रह केला जातो. आज तुमच्या साठी घेऊन आलो आहोत स्पेशल मराठी उखाणे (Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female).

People Also Read : सिंगापूर आणि मलेशिया बजेट ट्रिप इतक्या कमी किमतीत

Marathi Ukhane

जडतो तो जीव, लागते ती आस,
______ रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.

उड़णाऱ्या राजहंसाचे काळे नीळे डोळे

…….. रावांचे मन माझ्या हृदयात फिरे

आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा

…….. रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा

कर्ण ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,

…….. रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर.

इंग्लीश मध्ये गवताला म्हणतात ग्रास

…….. रावांचे नाव घेते तुमच्या साठी खास

दही, दूध, तूप आणि लोणी…

…….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी

मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण,

शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराण

पण हळुच सांगते कानात,

…….. राव आहेत माझे जीव की प्राण.

Marathi Ukhane

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,

…….. रावांचा नाव घेते सात जन्मासाठी

तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना

…….. रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्राथर्ना.

मंगल दिनी शुभ कार्याला आंब्याच्या पानांचा बांधतात तोरण

…….. रावांचे नाव घायला …….. च कारण

तांब्याच्या पळीवर नागाची खून,

…….. रावांचा नाव घेते…….. ची सून.

आई वडीलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात..

हसतमुखाने प्रवेश केला मी …….. रावांच्या जीवनात.

निळ्या शुभ्र आकाशात शोभते चंद्राची कोर

…….. राव सारखे पती मिळायला भाग्य लागत थोर.

पेटी वाजे तबला वाजे मंजुळ वाजे बासरी

…….. रावांच्या सप्तसुरांना साथ मिळाली हसरी

तिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण,

…….. नाव घेते …….. ची सून

नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
_______ रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.

बागेत फूल गुलाबाचे

माझ्या मनात नाव …….. रावांचे .

Marathi Ukhane

आभाळ भरले चांदण्यांनी, चंद्र मात्र एक

…….. रावांचे नाव घेते …….. ची लेक

नको मोहन माळ, नको हिऱ्याचा हार,
_______ रावांच्या जीवनात, मी सुखी आहे फार.

चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात,

…….. रावांचे नाव घेते, पावसाची झाली सुरवात.

कळी उमलली खुदकन हसली स्पर्श होता वाऱ्याचा

भाळी कुंकुम टिळा रेखीते…….. रावांच्या नावाचा

सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन

…….. रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,

…….. रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वां करिता

पाच वर्षांचा संसार पण प्रत्येक दिवस गोड,

तिन्ही सांजेला मनाला लागे …….. रावांची ओढ.

एका वर्षात महिने असतात बारा,

…….. रावांच्या नावातच सामावला आहे, आनंद माझा सारा.

Marathi Ukhane

आपुलकी असेल तर जीवन सुदंर,

संदेशाची आवड असेल तर मोबाइल सुंदर

फुले असेल तर बाग सुंदर

गालात ल्या गालात एक छोटस हसू असेल तर चेहरा दिसतो सुंदर

…….. रावांनबरोबरच सगळ ली नाती मनापासुन जपते म्हणुन माजे सासर सुंदर.

लेक लाडकी कुणाची, आईबापाची

सुन कुणाची, सासू सासरे ची

राणी कुणाची …….. रावांची

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,

…….. राव गेले कामाला म्हणून मला नाहि करमत.

रंगीत कपाटात जापानी बाहुली,

…….. रावांना जन्म देणारी धन्य ती माउली.

खोक्यात खोका टिव्ही चा खोका,

गप्प बसा नाहीतर देईन ठोसा.

बागेत फूल गुलाबाचे,

माझ्या मनात नाम …….. रावांचे

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा,

…….. रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा

चांदीचे ताट त्यात जेवायचा जावयाचा थाट

…….. रावांचे नाव घ्यायला रुपये लागतात  तिनशे साठ

Marathi Ukhane

खुर्चीत खुर्ची अन् …….. रावांची

बहीण लवंगी मिर्ची

केळी देते सोलून पेरू देते चिरून,

…….. स्वामींच्या जिवावर कुंकू लावते कोरुन.

लसणात लसून गावरान लसून ,

रावांची राणी म्हणते मी …….. ची सुन

परिजताकाच्या झाडा खाली हरिण घेतो विसावा,

…….. रावांच्या पाठीशी सदैव परमेश्वर असावा..

तांदळाच्या भाकरीवर अंड्याचा पोळा

…….. रावांच्या शेजारणीवर डोळा

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

ताज महल बनविताना कारागीर होते कुशल

…….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल

गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,

…….. रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.

मोबाईल वर गाणे ऐकते कानात हेडफोन टाकुन ,

आणि …….. रावांना missed कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..

मोहिनी माझं नाव येवला माझं गाव

…….. रावांच नाव घेते पाटील माझं आडनाव.

Marathi Ukhane

तुलसी माते तुलसी माते वन्दन करते मी तुला,

…….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य वती राहुदे मला.

नवरात्रित लावते अखंड दिवा

…….. रावांसाठी नेहमीच करत राहीन सेवा.

नवरात्रीच्या नऊ माळा, दहावी माळ म्हणजे दसरा

…….. रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा.

मोगऱ्याचा गजरा लावते मी वेणीला

…….. रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला.

छोट्याश्या वाटीत घास भरवे बाळाला,

…….. रावांचे नाव घेताना लाज कसली जिवाला

जीवनाच्या सागरात पती पत्नी ची तरली नौका

…….. रावांचे नाव घेते सर्वां नी नीट लक्ष देऊन ऐका.

कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज,

…….. रावांचे नाव घेते, वटपोर्णिमा आहे आज.

महादेवाच्या मंदिरात बेल वाहते वाकून

…….. रावांच नाव घेते तुमचा मान राखून

लाल मणि तोडले काळे मणि जोडले

…….. रावांसाठी आई वडिल सोडले

Marathi Ukhane

पीडयावर पीडे पाच पिडे

…….. रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुडे

केंद्रात केंद्र दूध केद्र

माझ्या नशिबात पडलं हे काळ चुचुंदर

ताटभर दगिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर,

…….. रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर.

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

सागरात सरिता जीवनात ज्योती

…….. राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती.

गुलाबाचे फुल मधोमध असते पिवळे,

…….. राव दिसतात कृष्णा सारखे सावळे

माणित मणी काळे मणी

…….. राव माझ्या मनाचे धनी

घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस,

…….. रावांच्या आयुष्यात चढवीन आनंदाचा कळस

Marathi Ukhane

केळीच्या पानांवर कोवळं कोवळे ऊन,

…….. रावांचे नाव घेते …….. ची सून.

कुंकू लावते लाल, त्यात पडला मोती,

…….. राव माझे पति मि त्यांची सौभाग्यवती.

अंगणातल्या तुळशीला घालते पळी पळी पाणी,

आदी होते आईवडीलांची तान्ही आता झाले…….. रावांची राणी

बसली होती दारात, नजर गेली आकाशात ……..

…….. रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात

रिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात

…….. रावांचे नाव घेते राहू द्या लक्षात.

प्रसंगानुरूप येते परमेश्वराची आठवण

…….. रावांच्या हृदयात अमृताची साठवण

फुल फुलावे रानोरानी स्वप्न गहिरे दिसावे

…….. रावांच्या सुखात माझे सुख असावे.

नात्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस,

…….. राव आमचे आहेत सर्वांपेक्षा सरस.

सुंदर माझे घर त्यात …….. रावांचा सुमधुर स्वर

आम्ही दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.

सत्यावनासाठी सवित्रिने यमाचा पुरविला पिच्छा,

सात जन्म …….. रावच माझे पति राहो हीच माझी इच्छा.

खाण तशी माती …….. राव माझे पती

आणि मी त्यांची सौभाग्यवती

साजुक तुपाच्या करते पुऱ्या टाकते पाट करते ताट

…….. राव बसले जेवायला, समया लावल्या तिनशे साठ

विटावर विटा सात विटा,

…….. रावांनच नाव घेते सगळी आता फुटा..

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

पानोपानी फुल फुलावे, त्यात गहीरे रंग भरावे,

…….. रावांच्या प्रेमळ सहवासात अस्तित्व मी माझे विसरावे

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी,
.. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवशी.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

Marathi Ukhane

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
… रावांचे नांव घेऊन करेन इच्छापूर्ती.

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
… रावांचे नांव घेते, …च्या घरात.

पूजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
… रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

रला यांनी हात, वाटली मला भिती,
हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.

नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
…रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन,

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
…रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,
आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,

चांदीचे जोडवे पतीची खुन,
.. रावांचे नांव घेते,… ची सुन.

दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं कौन?

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले
,

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे.

Special Marathi Ukhane-Navari-Bride-Female

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,
… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,
… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,
… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला,
… रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.

यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,
… रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.

वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : Special Marathi Ukhane for Navari-Bride-Female

घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,
घडविले देवानी… रावांना जीव लावून,

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,

 पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,
… रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,

People Also Read : विदर्भ स्पेशल सांबार वडी-पुडाची वडी

3 thoughts on “नव्या नवरी साठी स्पेशल मराठी उखाणे : 101+ Special Marathi Ukhane-Navari-Bride-Female”

Leave a comment