ड्रायफ्रूट मोदक रेसिपी- Dryfruit Modak Recipe-2023

करोनाचे सावट नाहीसे झाल्याने या वर्षी नेहमीप्रमाणे गणपतीचे स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झालेत. या वर्षी १९ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणेशोत्सवाची सध्या सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पाचे आपल्या घरी आगमन झाल्यावर, प्रत्येक घरात बाप्पासाठी रोज वेगवेगळा नेवेद्य बनवला जातो. या काळात बाप्पासाठी दररोज काय वेगळा प्रसाद करायचा असा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडतो. बाप्पाला मोदक खूप आवडतात आणि त्यामुळे जर तुम्हाला सर्वाना आवडेल असा आणि पौष्टिक मोदक बनवता आला तर ? चला तर मग, आम्ही तुम्हाला ड्रायफ्रूट मोदक रेसिपी (Dryfruit Modak Recipe) देतो आणि त्यांनुसार तुम्ही बाप्पासाठी ड्रायफ्रूट मोदक घरच्या घरी बनवा.

ड्रायफ्रूट मोदक - Dryfruit Modak

ड्रायफ्रूट मोदक घरच्या घरी बनवा- Dryfruit Modak Recipe

गणेशोत्सवात बाजारात कितीही प्रकारचे मोदक मिळत असले, तरी आपण बाप्पासाठी बनवलेल्या मोदकांची सर कशाला येणार नाही. ड्रायफ्रूट मोदक हे नावाप्रमाणे सुकामेवा आणि खजूर वापरून बनवतात. तसेच बरेच दिवस टिकत असल्याने तुम्हीही आपल्या नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जाताना घेऊन जाऊ शकता

Modak

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ३० मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण
Ukdiche Modak

साहित्य: Ingredients

  • १/४ कप डेसिकेटेड खोबरे
  • १ टीस्पून खसखस
  • २ टीस्पून काजू पावडर
  • २ टीस्पून काजू
  • २ टीस्पून बदाम
  • २टीस्पून पिस्ता
  • १ कप खजूर
  • २ टीस्पून तूप
  • १/४ टीस्पून वेलची पावडर

Khajur

Dryfruits

desicated-coconut

People Also Read : काकडीचे घारगे रेसिपी

कृती: Cooking Instructions

  • प्रथम खसखस भाजून एका डिश मध्ये काढून घ्यावी.
  • आता डेसिकेटेड खोबरे भाजून डिश मध्ये काढावे.
  • त्यानंतर काजू पावडर भाजून घ्यावी.
  • काजू, बदाम,पिस्ते यांचे बारीक काप करावेत.
  • खजुराचे बारीक तुकडे करावेत.
  • एका पॅनमध्ये तूप टाकून गरम करावे.
  • आता त्या गरम तुपामध्ये खजूर टाकून थोडा परतून घ्यावा.
  • आता त्यात काजू पावडर, खसखस, काजू , बदाम, पिस्ते आणि खोबरे टाकून सर्व मिश्रण चांगले परतून घ्यावे.
  • आता या मिश्रणाचा एक चांगला गोळा बनवून घ्यावा.
  • हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.
  • मोदकाच्या साच्यामध्ये पिस्ता चे काप आणि चिमूटभर खसखस टाकून, त्यावर वरील मिश्रण दाबून भरावे.
  • आता मोदकाचा साचा उघडून, हलक्या हाताने एका प्लेट मध्ये काढून घ्यावे.
  • बाप्पासाठी ड्रायफ्रूट मोदक रेसिपी ने (Dryfruit Modak Recipe) बनवलेले स्वादिष्ट मोदक तयार आहेत.

Dryfruit Modak

1 thought on “ड्रायफ्रूट मोदक रेसिपी- Dryfruit Modak Recipe-2023”

Leave a comment