काही दिवसांपूर्वी मी डाळिंबी वालाचे मुटगे कसे करावेत या बद्दल लिहिले होते. काही वाचकांनी ती वाचून डाळिंबीभात / वालाची खिचडी ही रेसिपी (Dalimbi Bhat-Valachi Khichdi) टाकण्यास सांगितली होती. वाचकांच्या आग्रहानुसार आज नारळाच्या दुधातील डाळिंबी भात – वालाची खिचडी ही रेसिपी (Dalimbi Bhat-Valachi Khichdi-tomato saar recipe in Marathi) टाकत आहोत. या वालाच्या खिचडी बरोबर टोमॅटोचे सार ही खूप छान लागतं म्हणून वालाची खिचडी सोबत टोमॅटोचे सार ची रेसिपी देत आहोत.
डाळिंबी भात – वालाची खिचडी आणि टाॅमेटोसार : Dalimbi Bhat-Valachi Khichdi- Tomato Saar
सध्या चा जमाना फास्ट फूड आणि रेडिमेड वस्तूंचा आहे. सगळीकडे स्वीगी/ झोमॅटो या वरून घरी बसल्या बसल्या खाण्यासाठी सर्व काही मागवता येते. बिर्याणीच्या जमान्यात, आपली महाराष्ट्राची पारंपरिक स्वादिष्ट डिश डाळिंबी भात किंवा वालाची खिचडी ही पण कुठे कमी नाही. कित्येक घरांमध्ये वालाची उसळ, वालाचे बिरडे आणि वालाची खिचडी बनवली जाते. गरमागरम वालाची खिचडी आणि त्यावर साजूक तूप, याची मजा काही औरच. या डाळिंब्या भात किंवा वालाच्या खिचडी सोबत, पापड आणि टोमॅटोचे सार असेल तर माञ जेवताना ब्रम्हानंदी टाळी लागते त्याचा अनुभव खवय्यांनी नक्कीच घेतला असेल. तर आज आम्ही देत आहोत नारळाच्या दुधातील डाळिंबी भात-वालाची खिचडी रेसिपी (Dalimbi Bhat-Valachi Khichdi- Tomato Saar Recipe in Marathi) . तुम्हाला टोमॅटो सार पण करायचा असेल, तर ती ही रेसिपी देत आहोत. अलिबाग,पालघर येथे चांगले कडवे वाल मिळतात. घरी आणून साफ करून उन्हात सुकवलेले कडवे वाल, वर्षभर वापरता येतात.
People Also Read : काकडीचे घारगे रेसिपी
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
किती जणांना पुरेल | २-४ जण |
साहित्य: Ingredients
डाळिंब्या भात- वालाची खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे;
- सोललेले डाळिंब्या/ वाल
- कोथिंबीर
- एक मोठा कांदा
- तांदूळ
- नारळाचे दूध
- कढीपत्ता
- दोन हिरव्या मिरच्या
- मोहरी
- जिरे
- हिंग
- २-३ काळेमिरे,
- २ लवंग,
- एक तमालपत्र,
- एक माध्यम आकाराचा दालचिनी तुकडा,
- दोन हिरव्या वेलची,
- १-२ मसाला वेलची
- गोडा मसाला
- गरम मसाला
- हळद
- चवीपुरते मीठ
- लिंबाचा रस
- हवे असल्यास आले-लसूण वाटण
कृती: Cooking Instructions
सदर रेसिपी कुकरच्या भांड्यात केलेली असून, तुम्ही कोणतेही भांडे वापरू शकता.
- कुकरच्या भांड्यात तेल टाकून गॅस वर गरम करत ठेवावे.
- तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, चार काळेमिरे, दोन लवंग, एक तमालपत्र, दीड इंच दालचिनी, दोन हिरव्या वेलची, एक मसाला वेलची टाकून एक ते दोन मिनिटे तडतडू द्या.
- आता त्यात उभी चिर मारलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता टाकून चांगले परतून घ्या.
- त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून कांदा शिजेस्तोवर चांगले परता.
- कांदा शिजल्यावर त्यामध्ये आले-लसूण पेस्ट टाका.
- आता त्यात गोडा मसाला, गरम मसाला, हळद, चवीपुरते मीठ टाकून चांगले परतून घ्यावे.
- सोललेल्या डाळिंब्या पाण्यातून काढून, भांड्यात टाकाव्यात आणि चांगल्या मिक्स करून घ्याव्यात.
- त्यावर लिंबाचा रस व कोथिंबीर टाकून चांगले परतून घ्या.
- आता निथळून घेतलेला तांदूळ टाकून, सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळा.
- आता त्यात पाणी आणि नारळाचे दूध टाकून मध्यम आचेवर ठेवा.
- एक उकळी आली की कुकरचे झाकण लावून तीन शिट्या घ्या.
- आता कुकरचे झाकण काढून बारीक चिरलेली कोथिंबीर वर पसरून टाका.
- आवडत असल्यास ताजे किसलेले खोबरे त्यावर टाका.
- खायला देताना गरमगरम खिचडीवर साजूक तूप टाका.
तुमची स्वादिष्ट वालाची खिचडी- डाळिंबी भात तयार आहे !!
टाॅमेटो सार: Tomato Saar
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
किती जणांना पुरेल | २-४ जण |
साहित्य: Ingredients
टोमॅटो सार साठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे;
- चार टाॅमेटो
- १ १/२ वाटी ताजे खवलेले खोबरे
- आल्याचा लहानसा तुकडा
- १/२ बारीक चिरलेला कांदा
- ५-६ लसूण पाकळ्या
- कढीपत्ता
- साजूक तुप
- जीरे
- चिमुटभर साखर
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीपुते मीठ
- तमालपत्र,
- ४-५ काळीमिरी
कृती: Cooking Instructions
- टाॅमेटोचे तुकडे करून, एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात ५-७ मिनिटे उकळवा.
- थंड झाल्यावर सालासकट हे टोमॅटो, मिक्सरच्या भांड्यामधे टाकून त्यात कांदा, लसूण, आले, कढीपत्त्याची पाने, एक हिरवी मिरची आणि खोवलेले खोबरे टाका .
- थोडा तिखट स्वाद आवडत असल्यास त्यात २-३ काळीमिरे टाका.
- आता हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये चांगले वाटून घ्या आणि स्वच्छ कपड्याने गाळून घ्या.
- एका कढईत जरासे तेल व ब-यापैकी साजूक तुप टाकून त्यात काळेमिरे व जीरे टाकावे.
- जिरे तडतडल्यावर त्यात २-३ कढीपत्त्याची पाने, ३-४ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण टाकून, लालसर होईपर्यंत परतून घ्यावे.
- आता या मध्ये वर तयार केलेले टोमॅटोचे मिश्रण कढईत घालून ढवळा.
- हवे असल्यास त्यात पाणी घाला आणि मग एक तमालपत्र टाकावे.
- आता त्या मध्ये चवीपुरते मीठ, साखर घालून चांगले थोडे दाट होईपर्यंत उकळवा.
- चांगले उकळल्यावर त्यात कोथिंबीर टाकून मग गॅस बंद करावा.
वालाच्या खिचडी सोबत, गरमागरम टोमॅटो सार खाण्यासाठी तयार आहे.
काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips
- बाजारातून आणलेली कोथिंबीर नीट निवडून आणि धुवून घ्यावी
- तांदूळ पाण्यात धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत.
- टोमॅटो सार करताना टोमॅटो मोठे आणि रसाळ असतील हे पाहावे.
- टोमॅटो सार ला लालसर रंग हवा असल्यास, तुम्ही एखादा बीटाचा तुकडा त्यात टाकू शकता.
- सार करताना, टोमॅटो चांगले उकळून घ्यावेत म्हणजे कच्चे राहणार नाहीत.
वर दिलेली डाळिंबी भात – वालाची खिचडी आणि टाॅमेटोसार ची रेसिपी (Dalimbi Bhat- Valachi Khichdi – Toamto Saar recipe) वापरून तुम्ही ही अगदी सहजतेने, वालाची खिचडी आणि टोमटो सार घरी बनवून पहा आणि पदार्थ कसे झाले ते आम्हालाही कमेंट करून कळवा.
Mast receipe
Great info and right to the point. I don’t know if this is truly the best place to
ask but do you guys have any ideea where to hire some professional writers?
Thanks 🙂 Escape rooms
I like this website very much, Its a real nice billet to read
and incur information..