Scam 2003 The Telgi Story : स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी

‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ या वेब सीरिज नंतर, हंसल मेहता एका नव्या स्कॅमची कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अब्दुल करीम तेलगी याच्या आयुष्यावर आधारित वेबसीरिज ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’:Scam 2003 The Telgi Story या आगामी सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तेलगीने तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा स्टँप पेपर घोटाळा केला होता.

SCAM2003-Webseries

स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी वेब सीरिज : Scam 2003 :The Telgi Story Web Series

‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ ही वेब सीरिज 2 सप्टेंबर २०२३ रोजी, सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तेलगी स्टँप घोटाळ्याचा छडा लावणारे पत्रकार संजय सिंग, यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावर सीरिजची कथा आधारित आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी यांनी केलं आहे.
“मुझे पैसे कमाने का कोई शौक नहीं है. क्यूंकी पैसा कमाया नहीं बनाया जाता है”, हा तेलगीचा फेमस संवाद यात वापरला गेला आहे. या वेब सिरीज मध्ये अब्दुल तेलगीची भूमिका, अभिनेते गगन देव रियार साकारणार आहेत.

वेब साईटला भेट द्या

SCAM2003-Web Series

स्टँप पेपर घोटाळा : Stamp Paper Scam


कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगी म्हणजे भारतीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आरोपी होता. भारतात कुठल्याही कारभारावर सरकारी शिक्कामोर्तब करणे म्हणजे मुद्रांक चिकटवणे. यामुळे भारतात मुद्रांकांना प्रचंड मागणी असायची आणि त्यामुळे त्याचा तुटवडा हि तेवढ्याच प्रमाणात असायचा.त्यातूनच मुद्रांकाचा काळाबाजार करायची कल्पना अब्दुल तेलगी याला सुचली आणि तेलगीने बनावट मुद्रांकाचा धंदा थाटला.
बनावट स्टँप पेपर चा वापर त्याने न्यायालयीन शुल्क स्टँप, महसुल स्टँप, विशिष्ट कारणांसाठी वापरलेले जाणारे वेगवेगळे स्टँप, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर ट्रान्स्फर सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स एजन्सी साठी केला. असे म्हटले जाते कि तेलगीने त्याच्या या धंद्यासाठी तब्बल 350 कर्मचारी नेमले होते. रेल्वेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयाचा मुलगा असलेल्या अब्दुल करीम तेलगी रेल्वेत अन्नपदार्थ विकायचा. त्यांनतर त्याने सौदी अरेबियात जाऊन काही काळ पैसा मिळवला. काही वेळ त्याने बनावट पासपोर्ट बनवले. मग बनावट मुद्रांक छपाई करायला सुरवात केली. १९९१ आणि १९९५ मध्ये त्याच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल झाले होते. मुंबईतच ट्रॅव्हल एजंट म्हणून तेलगी काही काळ काम करत होता. मुंबई पोलिसांनी १९९१ मध्ये सर्वप्रथम त्याला फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक केली होती. मुंबईत त्याने अंडरवर्ल्डशी सुत जुळवले आणि हळू हळू आपल्या गुन्हेगारीचे जाळे विस्तारले.

SCAM2003-Web Series

तेलगी घोटाळा : मोडस ऑपरेंडी


अब्दुल करीम तेलगीने १९९४ मध्ये बनावट मुद्रांकाच्या व्यवहारात पाऊल टाकले. सर्वप्रथम त्याने मुद्रांक विक्रेता म्हणून लायसन्स मिळविले आणि लगेचच नाशिक सिक्युरिटी प्रेसने मोडीत काढलेले एक मशिनही विकत घेतले. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसने मोडीत काढलेली मशिनरी एकापाठोपाठ एक विकत घेत तेलगीने बनावट मुद्रांक निर्मिती सुरू केली. त्याने याच प्रेसमधून बनावट मुद्रांक छपाईसाठी लागणारा विशिष्ट कागद आणि इतर तांत्रिक मदतही मिळविली. सिक्युरिटी प्रेस ज्या पद्धतीने मुद्रांक छापायचे, तसेच मुद्रांक छापायचा धंदा तेलगीने थाटला.

बऱ्याच वर्षांनी म्हणजे जानेवारी 2003 मध्ये तेलगीचे रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी फोन टॅपिंग सुरू केले आणि नोव्हेंबर 2003 मध्ये अजमेरमध्ये अब्दुल तेलगीला अटक झाली. अब्दुल तेलगीने दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे वीस हजार कोटी रूपयांचे बनावट मुद्रांक विकले असल्याचा अंदाज आहे. तेलगीचे एजन्ट रोज जवळ-जवळ पन्नास हजार रुपयांच्या बनावट मुद्रांकाची विक्री करायचे.

SCAM2003-Web Series

तेलगीने एकूण गैरव्यवहार 26 हजार कोटी ते 32 हजार कोटी रूपयांचा घोटाळा केला असल्याचे उघडकीस आले. त्याच्या अटकेपूर्वी काही दिवस आधी, त्याने मुंबईच्या ग्रँट रोडवर एका बारबालेवर तब्बल 93 लाख रूपये उधळल्याचेही तपासात समोर आले. तेलगीला 13 वर्षे सश्रम कारावास आणि 202 कोटी रूपयांचा दंड अशी शिक्षा त्याला 29 जून 2007 मध्ये झाली. २३ ऑक्टोबर २०१७ रोजी अब्दुल तेलगी मरण पावला.

दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी, SONY LIV वर अब्दुल तेलगी वरील वेब सिरीज SCAM 2003 : THE TELGI STORY बघायला विसरू नका,

Leave a comment