काला जामून रेसिपी : Kala Jamun Recipe in Marathi

मुलांसाठी काला जामून – काळा गुलाबजाम बनवायचे आहेत? तुम्हाला काला जामून रेसिपी (Kala Jamun Recipe) हवी आहे? चला तर मग आम्ही तुम्हाला हि रेसिपी देतो. तुम्ही स्वतः हि रेसिपी वापरून घरच्या घरी स्वादिष्ट काला जामून (गुलाबजाम) बनवा.

काला जामून – काळा गुलाबजाम: Kala Jamun Recipe

गुलाबजाम आवडत नाही असा मानून मिळणे जवळजवळ अशक्यच आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाना गुलाबजाम आवडतात. प्रत्येक कार्यक्रमात स्वीटडिश म्हणून गुलाबजाम दिसतोच दिसतो. गुलाबजाम हा शक्यतो दुधापासून तयार केलेल्या खव्या पासून बनवला जातो. तसे पहिले तर गुलाबजाम दोन प्रकारे तयार करू शकतो, एक खवा आणि मैदा एकत्र करून आणि दुसरे दूध पावडर व मैदा वापरून. खव्या पासून तयार केलेले गुलाबजाम एकदम स्वादिष्ट व नरम होतात. संपूर्ण भारतात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. गुलाबजाम हा अतिशय गोड आणि शुध्द शाकाहारी (Pure Veg) पदार्थ आहे, त्यामुळे डायबेटीस असलेल्या लोकांनी या पासून ४ हात लांबच राहावे. तर असा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ घरच्या घरी कसा बनवायचा हे आपण पाहूया..

Kala Jamun

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ१ तास
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण

People Also Read : ड्रायफ्रूट मोदक रेसिपी- Dryfruit Modak Recipe

साहित्य: Ingredients

  • २५० ग्राम गुलाबजामचा खवा/मावा
  • ४ टीस्पून आरारूट पावडर
  • १/४ वाटी रवा
  • १/२ वाटी पनीर
  • २ टीस्पून दूध
  • १/२ टीस्पून रोझ पिंक कलर
  • १/४ वाटी खडीसाखर
  • ५ वाटी पाणी
  • ३ वाटी साखर
  • चिमूटभर खायचा सोडा
  • टाळण्यासाठी डालडा किंवा तेल
  • चांदीचा वर्ख
  • काजूचे तुकडे

paneer

Araroot powder

Khadisakhar

कृती: Cooking Instructions

  • गुलाबजामचा खवा/मावा किसून घ्या
  • खव्यामध्ये पनीर, आरारूट पावडर, रवा घालावा.
  • वरील मिश्रणात चिमूटभर खायचा सोडा आणि दूध घालून खवा मळून घ्यावा.
  • मिश्रणातील छोटासा गोळा घेवून त्यामध्ये रोझ पिंक कलर टाकून पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे.
  • मळून घेतलेला मावा १५ मिनिटे झाकून ठेवावा.
  • पांढर्‍या गोळ्याचे आकाराने जरा मोठेच गोल लाडूसारखे करावे.
  • जेवढे गोळे पांढर्‍या गोळ्याचे होतील तेवढेच गूलाबी गोळ्याचे करावे.
  • पांढरा गोळा जरा हाताने खोलगट चपटा करून त्यामध्ये खडी साखरेचा दाणा, गुलाबी रंगाची गोळी आणि काजूचे काप टाकावेत व गोळ्याला गोल आकार द्यावा
  • हे गोळे तूमच्या आवडीनुसार तेलात किंवा तुपात तळून घ्यावेत.
  • गुलाबजाम तळताना पाण्याचे शिंतोडे मारावेत म्हणजे गुलाबजामला छान रंग येईल
  • गुलाबजाम तळताना आच मंद ठेवावी.
  • गुलाबजाम नीट तळून झाल्यावर, गॅस थोडा मोठा करून ते थोडेसे काळपट करावेत.
  • साखरेचा एकतारी पाक बनवावा.
  • आता तळलेले गुलाबजाम या पाकात ३०मिनिटें ठेवावेत.
  • आपल्या काला जामून रेसिपी (Kala Jamun Recipe) नुसार बनवलेले गुलाबजाम तयार आहेत.
  • एका प्लेट मध्ये २-४ गुलाबजाम काढून त्यावर चांदीचा वर्ख लावून सर्व करावेत.

Kala Jamun

तुम्ही ही रेसिपी वापरून घरच्या घरी हा पदार्थ नक्की करून पहा आणि कॉमेंट्स मध्ये आम्हाला ही कळवा.

Frequently Asked Question : FAQ

उपवासात गुलाब जामुन खाऊ शकतो का?

होय! गुलाबजाम दुधाच्या पदार्थापासून बनवलेला असल्याने पूर्णपणे शाकाहारी पदार्थ आहे. तुम्ही तुमच्या उपवासाच्या दिवसात गुलाब जामुन खाऊ शकता .

गुलाबजाम मध्ये किती कॅलरीज असतात?

साधारणपणे एका गुलाबजाम मध्ये सुमारे 175 कॅलरीज असतात.


गुलाबजाम बनवण्यासाठी कोणते पीठ वापरले जाते?

गुलाबजाम बनवण्यासाठी मैदा किंवा आरारूट पावडर वापरली जाते.

कोणकोणत्या पदार्थापासून गुलाबजाम बनवता येतात ?

भारतात अनेक प्रकारचे गुलाबजाम मिळतात.वेगवेगळे पदार्थ वापरून गुलाबजाम बनवता येतात जसे, पनीर गुलाबजाम, ब्रेड गुलाबजाम, रताळ्याचे गुलाबजाम, मावा गुलाबजाम असे

4 thoughts on “काला जामून रेसिपी : Kala Jamun Recipe in Marathi”

  1. कॅलरी आणि उपवासाला खाऊ शकतो का ह्या दोन्ही माहिती खूप उपयुक्त आहेत

Leave a comment