अनसा-फणसाची भाजी : Ansa Phansachi Bhaji-2023

अनसा-फणसाची भाजी (Ansa Phansachi Bhaji) खाल्ली आहे का तुम्ही? आंबटगोड चव असलेली ही पारंपरिक भाजी करून तर बघा, तुमच्या घरातील सर्वाना नक्की आवडेल.

अनसा-फणसाची भाजी : Ansa Phansachi Bhaji (Pineapple-Mango-Jackfruit Curry)

अनसा-फणसाची भाजी (Ansa Phansachi Bhaji) हे नाव कित्येकांनी पहिल्यांदाच ऐकले असेल, पण ही पारंपरिक भाजी कित्येक गृहीणी आपल्या घरात बनवतात. नावाप्रमाणेच या भाजीत अननस,फणस आणि आंबा घातला जातो. आंबट-गोड चवीची ही अनसा-फणसाची भाजी (Ansa fansachi Bhaji) लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडते. तुम्हालाही अनसा-फणसाची भाजी बनवायची आहे ? तर काही काळजी करू नका, खाली दिलेल्या रेसिपी नुसार तुम्ही अगदी सहजतेने ही भाजी घरच्या घरी बनवू शकता.

Ansa-Phansachi Bhaji

रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ२०-३० मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ१०-१५ मिनिटे
किती जणांना पुरेल२-४ जण

अनसा-फणसाची भाजी : Ansa Phansachi Bhaji

People Also Read : काकडीचा केक-काकडीचा धोंडस : Kakdicha Cake Recipe

साहित्य: Ingredients

  • एक वाटी अननस (मध्यम फोडी)
  • फणसाचे गरे (उभे तुकडे)
  • एक वाटी आंबा ( आंब्याच्या लहान फोडी)
  • एक वाटी आंब्याचा रस
  • ओले खोबरे (खोवलेले )
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • २-३ हिरव्या मिरच्या किंवा सुकी बेडगी मिरच्या
  • १०-१२ काळमिरे
  • मोहरी
  • हिंग
  • काश्मिरी मिरची पावडर
  • गुळ
  • चवीपुरते मीठ
  • चवीपुरता चिंचेचा कोळ
  • हळद पावडर
  • धणा-जीरा पावडर
  • काजू पाकळी
  • खोबरेल तेल

Jackfruit

Pineapple

Mango

कृती: Cooking Instructions

  • एका कढईत खोबरेल तेल घालून मोहरी तडतडू द्यावी.
  • आता तेलात चिमूटभर हिंग आणि हिरव्या मिरच्या किंवा सुकी बेडगी मिरची परतून घ्यावी.
  • यानंतर त्यात अननसाच्या फोडी परतून घ्याव्यात.
  • आता त्यात हळद, चवीपुरते मीठ, धणा जीरा पुड, लाल रंग येण्यासाठी काश्मिरी मिरची पावडर घालून परतवून घ्या.
  • आता यामध्ये थोडासा गूळ आणि फणसाचे तुकडे घालून वाफ काढावी.
  • वाफ येईपर्यंत खोवलेले खोबरे आणि काळे मिरे एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.
  • भाजीला वाफ आल्यावर त्यात हे वाटण टाकून परतून घ्यावे.
  • आता भाजीत एक वाटी आंब्याचे तुकडे आणि एक वाटी आंब्याचा रस टाकावा.
  • काजू तुपावर परतून त्याचे तुकडे भाजीत घालावेत.
  • चिंचेचा कोळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा वाफ घ्यावी.
  • तुमची अनसा-फणसाची भाजी (Ansa Phansachi Bhaji) खायला तयार आहे.
  • ही भाजी तुम्ही चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता.

Mango-Pineapple-Jackfruit curry

People Also Read : चटपटीत चणा कोळीवाडा रेसिपी- Chana Koliwada recipe

काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips

  • अननस आंबट नसल्यास चिंचेचा कोळ थोडा जास्त वापरावा.
  • हिरव्या मिरच्यांऐवजी सुक्या लाल मिरच्या वापरल्यास अजून छान चव येते.
  • काजू ओगदारच तुपावर परतून घ्यावेत म्हणजे वेळ वाचेल.
  • खोबरेल तेल नको असल्यास, घरातील नेहमीचे तेल वापरावे.

Ansa-Phansachi Bhaji

तर अश्या रीतीने तुम्ही वरील रेसिपी वापरून अगदी सहज ही अनसा-फणसाची भाजी घरच्या घरी बनवू शकता. ही भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हालाही कळवा.

3 thoughts on “अनसा-फणसाची भाजी : Ansa Phansachi Bhaji-2023”

Comments are closed.