अनसा-फणसाची भाजी (Ansa Phansachi Bhaji) खाल्ली आहे का तुम्ही? आंबटगोड चव असलेली ही पारंपरिक भाजी करून तर बघा, तुमच्या घरातील सर्वाना नक्की आवडेल.
अनसा-फणसाची भाजी : Ansa Phansachi Bhaji (Pineapple-Mango-Jackfruit Curry)
अनसा-फणसाची भाजी (Ansa Phansachi Bhaji) हे नाव कित्येकांनी पहिल्यांदाच ऐकले असेल, पण ही पारंपरिक भाजी कित्येक गृहीणी आपल्या घरात बनवतात. नावाप्रमाणेच या भाजीत अननस,फणस आणि आंबा घातला जातो. आंबट-गोड चवीची ही अनसा-फणसाची भाजी (Ansa fansachi Bhaji) लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडते. तुम्हालाही अनसा-फणसाची भाजी बनवायची आहे ? तर काही काळजी करू नका, खाली दिलेल्या रेसिपी नुसार तुम्ही अगदी सहजतेने ही भाजी घरच्या घरी बनवू शकता.
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | २०-३० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | १०-१५ मिनिटे |
किती जणांना पुरेल | २-४ जण |
People Also Read : काकडीचा केक-काकडीचा धोंडस : Kakdicha Cake Recipe
साहित्य: Ingredients
- एक वाटी अननस (मध्यम फोडी)
- फणसाचे गरे (उभे तुकडे)
- एक वाटी आंबा ( आंब्याच्या लहान फोडी)
- एक वाटी आंब्याचा रस
- ओले खोबरे (खोवलेले )
- कोथिंबीर (बारीक चिरलेली)
- २-३ हिरव्या मिरच्या किंवा सुकी बेडगी मिरच्या
- १०-१२ काळमिरे
- मोहरी
- हिंग
- काश्मिरी मिरची पावडर
- गुळ
- चवीपुरते मीठ
- चवीपुरता चिंचेचा कोळ
- हळद पावडर
- धणा-जीरा पावडर
- काजू पाकळी
- खोबरेल तेल
कृती: Cooking Instructions
- एका कढईत खोबरेल तेल घालून मोहरी तडतडू द्यावी.
- आता तेलात चिमूटभर हिंग आणि हिरव्या मिरच्या किंवा सुकी बेडगी मिरची परतून घ्यावी.
- यानंतर त्यात अननसाच्या फोडी परतून घ्याव्यात.
- आता त्यात हळद, चवीपुरते मीठ, धणा जीरा पुड, लाल रंग येण्यासाठी काश्मिरी मिरची पावडर घालून परतवून घ्या.
- आता यामध्ये थोडासा गूळ आणि फणसाचे तुकडे घालून वाफ काढावी.
- वाफ येईपर्यंत खोवलेले खोबरे आणि काळे मिरे एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.
- भाजीला वाफ आल्यावर त्यात हे वाटण टाकून परतून घ्यावे.
- आता भाजीत एक वाटी आंब्याचे तुकडे आणि एक वाटी आंब्याचा रस टाकावा.
- काजू तुपावर परतून त्याचे तुकडे भाजीत घालावेत.
- चिंचेचा कोळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा वाफ घ्यावी.
- तुमची अनसा-फणसाची भाजी (Ansa Phansachi Bhaji) खायला तयार आहे.
- ही भाजी तुम्ही चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता.
People Also Read : चटपटीत चणा कोळीवाडा रेसिपी- Chana Koliwada recipe
काही महत्वाच्या टिप्स : Additional Important Tips
- अननस आंबट नसल्यास चिंचेचा कोळ थोडा जास्त वापरावा.
- हिरव्या मिरच्यांऐवजी सुक्या लाल मिरच्या वापरल्यास अजून छान चव येते.
- काजू ओगदारच तुपावर परतून घ्यावेत म्हणजे वेळ वाचेल.
- खोबरेल तेल नको असल्यास, घरातील नेहमीचे तेल वापरावे.
तर अश्या रीतीने तुम्ही वरील रेसिपी वापरून अगदी सहज ही अनसा-फणसाची भाजी घरच्या घरी बनवू शकता. ही भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हालाही कळवा.
Hatake dish
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
must try dish
hello there and thank you for your info – I’ve certainly picked
up something new from right here. I did however expertise some technical points using
this site, as I experienced to reload the website a lot of times
previous to I could get it to load properly.
I had been wondering if your web hosting is OK?
Not that I am complaining, but slow loading instances times will sometimes
affect your placement in google and could damage your high-quality score
if ads and marketing with Adwords. Anyway I am adding this RSS to my e-mail and could look out for much more of your respective fascinating content.
Make sure you update this again very soon..
Escape room lista
I was looking through some of your blog posts on this site and I think this site is real informative!
Retain posting.?